सुमारे सहा सात वर्षापुर्वी कर्नाटक राज्यातील हुलसुर येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या अनावरणप्रसंगी, माजीमुख्यमंत्री बी.एस.येडीयुरप्पा यांच्या प्रमुख उपस्थितीत माझे भव्य व्याख्यान झाले होते. आसपासच्या दहा बारा गावाहून त्यावेळी लोकंआली होती. हजारो श्रोते समोर बसलेले असताना प्रत्येक श्रोता वक्त्याच्या लक्ष्यात राहणे अशक्यच पण वक्ता मात्र प्रत्येक श्रोत्याच्याडोक्यात दीर्घकाल जीवंत राहू शकतो हे खालील उदाहरणावरून सिध्द होते.
मागील महिन्यात माझे व्याख्यानाचे दौरे सुरु असतानाच कर्नाटकातील तलवाड गावातून नवयुवक तरुण मंडळाच्या संतोष बिरादार यांचाफोन आला की त्यांच्या गावात उभारलेल्या छत्रपती शिवरायांच्या अश्वारूढ पुतळयाच्या उद्घाटनप्रसंगी आयोजित केलेल्याव्याख्यानाच्या कार्यक्रमासाठी त्यांना माझी तारीख हवी होती. मी म्हणले “तुम्ही कुठे ऐकले माझे व्याख्यान ?” तेव्हा ते म्हणाले की“तुमच्या हुलसूरच्या कार्यक्रमाला आम्ही आलो होतो. तेव्हाच ठरवले होते की आपल्या गावात स्मारक उभारले की तुम्हालाचबोलवायचे”. त्यांच्या या वाक्याने मी भाराहून गेलो. त्यांना नियोजित तारीख विचारुन मी लागलीच डायरीत टिपून ठेवली.
खरं तर असे प्रसंग प्रत्येक वक्त्याच्या आयुष्यात येत असतात पण जेव्हा लोकं आपल्याला तासभर ऐकून तब्बल सहा सात वर्ष आठवणठेवून बोलवतात तेव्हा असे प्रसंग अभिमानाने टायपून शेअर केले जातात त्यांपैकीच हा एक. बाकी आत्मविश्वासाने सांगतो येत्या १९मार्चला कर्नाटकातील शिवभक्तांच्या आयुष्यभर स्मरणात राहिल असे व्याख्यान होईल. कर्नाटकवासियांनो तुमच्या कानावर माझ्याशब्दांचा अभिषेक करुन शिवप्रभूंना वंदन करण्यासाठी मी येतोय तुमच्या तलवाड मराठा नगरीत. अवघे अवघे या, शिवचरित्राचा जागरकरू या !
प्रा.विशाल गरड
१६ मार्च २०२३, पांगरी