Thursday, March 16, 2023

सीमोल्लंघन

सुमारे सहा सात वर्षापुर्वी कर्नाटक राज्यातील हुलसुर येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या अनावरणप्रसंगी, माजीमुख्यमंत्री बी.एस.येडीयुरप्पा यांच्या प्रमुख उपस्थितीत माझे भव्य व्याख्यान झाले होते. आसपासच्या दहा बारा गावाहून त्यावेळी लोकंआली होती. हजारो श्रोते समोर बसलेले असताना प्रत्येक श्रोता वक्त्याच्या लक्ष्यात राहणे अशक्यच पण वक्ता मात्र प्रत्येक श्रोत्याच्याडोक्यात दीर्घकाल जीवंत राहू शकतो हे खालील उदाहरणावरून सिध्द होते. 


मागील महिन्यात माझे व्याख्यानाचे दौरे सुरु असतानाच कर्नाटकातील तलवाड गावातून नवयुवक तरुण मंडळाच्या संतोष बिरादार यांचाफोन आला की त्यांच्या गावात उभारलेल्या छत्रपती शिवरायांच्या अश्वारूढ पुतळयाच्या उद्घाटनप्रसंगी आयोजित केलेल्याव्याख्यानाच्या कार्यक्रमासाठी त्यांना माझी तारीख हवी होती. मी म्हणले “तुम्ही कुठे ऐकले माझे व्याख्यान ?” तेव्हा ते म्हणाले की“तुमच्या हुलसूरच्या कार्यक्रमाला आम्ही आलो होतो. तेव्हाच ठरवले होते की आपल्या गावात स्मारक उभारले की तुम्हालाचबोलवायचे”. त्यांच्या या वाक्याने मी भाराहून गेलो. त्यांना नियोजित तारीख विचारुन मी लागलीच डायरीत टिपून ठेवली. 


खरं तर असे प्रसंग प्रत्येक वक्त्याच्या आयुष्यात येत असतात पण जेव्हा लोकं आपल्याला तासभर ऐकून तब्बल सहा सात वर्ष आठवणठेवून बोलवतात तेव्हा असे प्रसंग अभिमानाने टायपून शेअर केले जातात त्यांपैकीच हा एक. बाकी आत्मविश्वासाने सांगतो येत्या १९मार्चला कर्नाटकातील शिवभक्तांच्या आयुष्यभर स्मरणात राहिल असे व्याख्यान होईल. कर्नाटकवासियांनो तुमच्या कानावर माझ्याशब्दांचा अभिषेक करुन शिवप्रभूंना वंदन करण्यासाठी मी येतोय तुमच्या तलवाड मराठा नगरीत. अवघे अवघे या, शिवचरित्राचा जागरकरू या !


प्रा.विशाल गरड

१६ मार्च २०२३, पांगरी




Saturday, March 4, 2023

रौंदळ - गोड ऊसाची, कडू कहानी

रौंदळ मधे दाखवलेली शेतकऱ्याची गोष्ट फक्त हिंगणी गावातल्या ऊस उत्पादक शेतकऱ्याची नसुन ती इथल्या प्रत्येक शेतकऱ्याची आहे. आपला देश कृषिप्रधान आहे हे चित्रपटातूनही दिसायला हवे आणि रौंदळ मधे ते गडद करुन दाखवलं त्याबद्दल लेखक आणि दिग्दर्शकगजानन पडोळ यांचे आभार. सिनेमात ग्रामीण जीवनशैलीचा कॅनव्हास खूप छान पद्धतीने मांडला गेलाय त्यातच फायटींगसोबतचगावरान प्रेमकहाणी अधुन मधून अलगदपणे सुगंध दरवळत येत राहते. 


रौंदळ मधील बरीच पात्र दोस्तांनी रंगवली असल्याने पहिल्याच दिवशी हा चित्रपट पाहने बंधनकारक होते. शिवाचे मुख्य पात्रसाकारणारे भाऊ शिंदे, बिट्टूचे खलनायकी पात्र साकारणारे यशराज डिंबळे, सरपंचाचे पात्र साकारलेले विनायक पवार आणि निर्मातेप्रमोद चौधरी या माझ्या दोस्तांनी चित्रपटात प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. रौंदळ मधील सर्व गाणी जणू नववधूवर चढवलेल्यासोन्याच्या अलंकाराप्रमाणे उठून दिसतात. कथानक वास्तवाला घट्ट मिठी मारलेलं असल्याने शेती जगलेल्या आणि भोगलेल्याप्रत्येकाच्या ह्रदयाला ते स्पर्शून जाते. 


शिवाची भूमिका साकारलेल्या भाऊंनी अभिनय करताना चेहऱ्यावरचे हावभाव दाखवण्यात आखडता हात घेतल्याचे जाणवते याउलटबिट्टूचे पात्र साकारलेला यशराज आणि अभिनेत्रीचे पात्र साकारलेल्या नेहाने दिसण्यातून, वागण्यातून आणि बोलण्यातून अभिनयाचीमुक्त उधळण केली असल्याने रौंदळमधे हिरोपेक्षा व्हिलन आणि हिरोइनच जास्त भाव खावून जाते. 


असो, शेतकऱ्यांचे ज्वलंत प्रश्न मांडणारे खूप कमी चित्रपट मोठ्या पडद्यावर येत असतात. शेतकऱ्यांनी ते पाहायलाच हवेत. ‘त्यांनाभाकर द्यायची नसते, फक्त दाखवायची असते’  देशाला भाकरी पुरवणाऱ्या शेतकऱ्यांबद्दल कारखान्याच्या चेअरमनच्या तोंडुन निघालेलंहे वाक्य चित्रपटाच्या कथानकातला आत्मा आहे. अधिकचे लिहीत नाही. आपल्या मातीतला आणि माणसातला हा सिनेमा शेतकऱ्यांनीअवश्य बघावा. 


प्रा. विशाल गरड

३ मार्च २०२३






सोनवणे सरांना अखेरचा सलाम.

​ सोनवणे सर या जगात नाहीत यावर अजूनही विश्वास बसत नाही. अभाळाएवढा माणूस पण असा एका क्षणात संपावा हे माझ्या मनाला न पटणारं आणि न सुटणारं कोडं...