Saturday, March 4, 2023

रौंदळ - गोड ऊसाची, कडू कहानी

रौंदळ मधे दाखवलेली शेतकऱ्याची गोष्ट फक्त हिंगणी गावातल्या ऊस उत्पादक शेतकऱ्याची नसुन ती इथल्या प्रत्येक शेतकऱ्याची आहेआपला देश कृषिप्रधान आहे हे चित्रपटातूनही दिसायला हवे आणि रौंदळ मधे ते गडद करुन दाखवलं त्याबद्दल लेखक आणि दिग्दर्शकगजानन पडोळ यांचे आभारसिनेमात ग्रामीण जीवनशैलीचा कॅनव्हास खूप छान पद्धतीने मांडला गेलाय त्यातच फायटींगसोबतचगावरान प्रेमकहाणी अधुन मधून अलगदपणे सुगंध दरवळत येत राहते


रौंदळ मधील बरीच पात्र दोस्तांनी रंगवली असल्याने पहिल्याच दिवशी हा चित्रपट पाहने बंधनकारक होतेशिवाचे मुख्य पात्रसाकारणारे भाऊ शिंदेबिट्टूचे खलनायकी पात्र साकारणारे यशराज डिंबळेसरपंचाचे पात्र साकारलेले विनायक पवार आणि निर्मातेप्रमोद चौधरी या माझ्या दोस्तांनी चित्रपटात प्रमुख भूमिका साकारल्या आहेतरौंदळ मधील सर्व गाणी जणू नववधूवर चढवलेल्यासोन्याच्या अलंकाराप्रमाणे उठून दिसतातकथानक वास्तवाला घट्ट मिठी मारलेलं असल्याने शेती जगलेल्या आणि भोगलेल्याप्रत्येकाच्या ह्रदयाला ते स्पर्शून जाते


शिवाची भूमिका साकारलेल्या भाऊंनी अभिनय करताना चेहऱ्यावरचे हावभाव दाखवण्यात आखडता हात घेतल्याचे जाणवते याउलटबिट्टूचे पात्र साकारलेला यशराज आणि अभिनेत्रीचे पात्र साकारलेल्या नेहाने दिसण्यातूनवागण्यातून आणि बोलण्यातून अभिनयाचीमुक्त उधळण केली असल्याने रौंदळमधे हिरोपेक्षा व्हिलन आणि हिरोइनच जास्त भाव खावून जाते


असोशेतकऱ्यांचे ज्वलंत प्रश्न मांडणारे खूप कमी चित्रपट मोठ्या पडद्यावर येत असतातशेतकऱ्यांनी ते पाहायलाच हवेत. ‘त्यांनाभाकर द्यायची नसतेफक्त दाखवायची असते’  देशाला भाकरी पुरवणाऱ्या शेतकऱ्यांबद्दल कारखान्याच्या चेअरमनच्या तोंडुन निघालेलंहे वाक्य चित्रपटाच्या कथानकातला आत्मा आहेअधिकचे लिहीत नाहीआपल्या मातीतला आणि माणसातला हा सिनेमा शेतकऱ्यांनीअवश्य बघावा


प्राविशाल गरड

 मार्च २०२३






No comments:

Post a Comment

गुलीगत सुरजचा विजय असो !

निर्विवाद, निखळ आणि निरागस विजय !  ना मी बिग बॉस पाहिला, ना मी कुणाला मतदान केलय. त्याचे कारण असे की मी मुळात टीव्हीच फार कमी पाहतो. महत्वाच...