मैत्रीला वय नसतं हे वाक्य ज्या माणसाकडे पाहून जगता येते ते म्हणजे लोकमतचे मा.संपादक, जेष्ठ पत्रकार आणि विचारवंत राजा माने साहेब होय. ते जेव्हा पण भेटतात तेव्हा जिवलग मित्राला भेटल्याचा फिल देतात. आज खूप दिवसांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची सप्रेम भेट घेतली. दिलखुलास गप्पा मारल्या, मार्गदर्शन आणि आशिर्वाद घेतले. साहेबांबरोबर काही वेळ जरी घालवला तरी हजार माणसांना भेटल्याचे समाधान भेटते. माने साहेबांचे मैत्र संबंध म्हणजे जणू मोहोळ आहे. महाराष्ट्रातले कोणतेही क्षेत्र निवडा त्या क्षेत्रातील शे पाचशे जिवलग माणसं माने साहेबांनी जोडलेली सापडतील. बाकी माने काकूंनी केलेला चहा एवढा अप्रतिम झाला होता की खास चहा साठी पुन्हा एकदा त्यांच्या घराची पायरी चढावी लागेल.
विशाल गरड
दिनांक : २५ जुलै २०२१
No comments:
Post a Comment