Sunday, April 9, 2023

घर बंदूक बिरयानी

पिच्चरच्या स्टार्टिंगलाच कोलागडचं जंगल दिसतंयमग हळू हळू वरुण हेलिकॉप्टरचा आवाज यायला लागतंयथोडा येळ वाटतंय कीआता जंगलावरून उडणारं हिलिकॉप्टर दिसल पण अचानक स्क्रिनवरुण भुंगा बाहेर निघतंयघर बंदूक बिर्याणीचं नेमकं असंच झालंयहेमंत आवताडेंच्या खांद्यावर बंदूक ठिवून नागराज अण्णाने मारलेल्या गोळीचा नेम हुकलायचविष्ठ बिर्याणी करण्याच्या प्रामाणिकप्रयत्नात फोडनीचा भात होवून बसलाय


पिच्चर बघताना नेमकं कुठं सिरियस व्हावं आन कुठं हसावं हेच समजत न्हवतंमराठीला साऊथची फोडणी देण्याचा आण्णांनी झ्याकप्रयत्न केलाय पण हे करत असताना दोन जॉनर मिक्स करण्याच्या नादात चाल सोडून बिरयानीची फोडणीच बिघडलीसमदा पिच्चरतयार हुस्तोर डायरेक्टरकडून त्यो शंभरयेळा तरी बघितला जात आस्तुयमग`थेटरात ही बोअर मारील’ हे आण्णा सारख्या अनुभवीडायरेक्टरला एकदाबी का न्हाई लक्षात आलं ? कदाचित त्येंच्याकडून आपून जास्त आपेक्षा ठिवल्या आसत्याल्या म्हणूनबी आसं वाटतआसावं हे बी तितकच खरंय.


जवा पाठराखेची पोरं राया पाटलाला म्हणतात की `आमचा बाप कोण हाय तुला माहीत हाय का ?’ तवा राया पाटिल`समद्याचा बापएकच’ आसं म्हणून फ्रेममधून बाजुला जातो आन त्याच्या म्हागं छत्रपती शिवाजी महराजांचा अश्वारूढ पुतळा दिसतोअख्ख्यापिच्चरमधी ह्यो सीन अंगावर काटा आणतोमांसाहाराचे समर्थन करणारा गुराचा प्रदीर्घ डायलॉग आणि जॉर्जचे अस्सखलित हिंदीडायलॉग मनाला स्पर्शुन जातातनागराजने रायालाआमच्या विठ्ठलने जॉर्जला आन प्रवीणने गुराला पुरेपुर न्याय दिलायसोमासूरजअरबाजतानाजीनेही नैसर्गिक अभिनय केलाय.


जीबीबीनं डिपार्टमेंट मधलं बरं वाईट वास्तव ठळक केलंयनक्षलवाद्यांचं म्हणणं सरकारपर्यंत पुहुचिवलंयराज्यकर्त्यांचा बुरखाफाडलायलोकेशन परफेक्ट घेतल्यातदुसऱ्या आन तिसऱ्या फळीत लंय मट्या आशील नटांला चान्स दिलायप्रफुल्लचंद्रच्या संगीतानेप्रफुल्लित केलंयसायली जणू बिरयानीवर टाकलेल्या चेरीसारखी दिसलीयेरायाची एंट्री झक्कास जमलीये


आन ह्ये बघा जर तुम्ही वशाट खाणारे असचाल तर पिच्चर बघून बिर्याणी खायची तलफ ह्येवढी जब्राट व्हइल की थेटरातून बाहिरपडताच पहिलं हाटेल गाठावं लागलकाय झाडीकाय डोंगारकाय बंदूक सगळं कसं ओक्केमधे नायकाय राव आण्णाथेटरात मस्तबोकडाची न्हायतर चिकनची बिरयानी खायला मिळल आसं वाटलं व्हतं पण तुम्ही राव माकडाची बिरयानी खाऊ घातली


असोझालं ते झालं बिरयानीची भांडी धुवून नव्या प्रयोगाला तयार ऱ्हावासमद्यास्नी शुभेच्छा हैतबाकी पिच्चरशौकिन्यांनोबघण्याचाआणि लिव्हण्याचा ज्यजा त्येजा आंदाज निराळा आसतोय म्हणून परीक्षण वाचून पिच्चर बगावा का नगं ठरवू नगाथेटरात जाऊनतुमच्या तुम्ही ठरवा पिच्चर कसा हाय ती.


आण्णा,

तुम्ही फेसबुकवरचं रिव्हिव वाचत न्हाईत म्हणून ह्यो लेख तुमच्या वॉलवर नाही टांगतरोखठोक इचार मांडणारे खरे दोस्त असत्यातऊगंतुम्हासनी चांगलं वाटावं म्हणून ग्वाड ग्वाड लिव्हनं बुद्धीला पटलं नाय म्हणून ताटात वाढल्याली तुमची पिच्चररूपी बिरयानी खाऊन जेवाटलं ते इनाफिल्टर टायपीलंयवलख राहू द्या !


ईशाल गरड

 एप्रिल २०२३पांगरी




No comments:

Post a Comment

गुलीगत सुरजचा विजय असो !

निर्विवाद, निखळ आणि निरागस विजय !  ना मी बिग बॉस पाहिला, ना मी कुणाला मतदान केलय. त्याचे कारण असे की मी मुळात टीव्हीच फार कमी पाहतो. महत्वाच...