Wednesday, June 14, 2023

TDM

TDM हा सिनेमा एक्चुअली मला पहिल्या खेपेसच पहायचा होता पण माझ्या वेळेचे आणि शोचे टायमिंग जुळोस्तोर भाऊरावांनी शोला ब्रेकलावला आणि जेव्हा दुसऱ्यांदा पुनःप्रदर्शित झाला तेव्हा मेडिकल एमर्जन्सीमुळे पहिले दोन तीन दिवस नाही पाहता आलाअखेर कालच आम्हाला कन्यारत्न प्राप्त झालेनव्या बाळाला लस वगैरे देवून बापाचे प्रेम आणि कर्तव्य पार पाडून माझे चित्रपट प्रेम जोपासायला विराच्या परवानगीने दवाखाना सोडलादोस्तांनी एवढ्या मेहनतीने निर्माण केलेली कलाकृती मिस होवू नये म्हणून घरी आल्या आल्या मी पहिले हनुमंतला बोलावून घेतले आणि रात्री नऊ ते बाराच्या शो साठी थेट बार्शीचे गोल्डन सिनेमॅक्स थिएटर गाठलेतिथे गेलो तर तिकीट काउंटरवर फक्त आम्ही दोघेच होतोकॅशिअर म्हणले अजुन एक दोन जण आले तरच शो होईल नाहीतर रद्द करावा लागेलघड्याळात सव्वा नऊ वाजले होतेएवढ्या वेळात वेळ काढून पांगरीवरून खास TDM बघायला आलो आणि आता जर नाही पाहायला मिळाला तर मग पुन्हा थिएटरला पाहायचा योग अशक्य वाटत होता म्हणून मी कॅशिअरला विनंती केली की आता कुणाची वाट नका बघू, मीच चार तिकिटे काढतो पण शो रद्द नका करूत्यांनीही विनंती मान्य केली आणि फक्त आमच्या दोघांसाठी गोल्डन सिनेमॅक्सने शोसुरु केला


चित्रपटाची सुरुवात शिवरायांची गाथा गाणाऱ्या पिंगळ्या पासून होते त्यांनतर स्क्रिनवर येतो ग्रामीण तरुणांचे प्रतिनिधित्व करणारा सिक्स पॅकवाला हिरो बाबूतो आंघोळ करताना पाणी जरी त्याच्या अंगावरून ओघळत असले तरी ते वास्तवात मात्र आपल्या मनावर चढलेला गेल्या वीस वर्षांचा काळ पुसून आपल्याला थेट नव्वदीच्या दशकात १९९५-९६ सालात घेवून जातेतिथ पासून ते शेवटपर्यंत एकही क्षण आपण तो नव्वदीचा एरा सोडत नाहीत इतक्याकमालीचे कलादिग्दर्शन आमच्या अतुल लोखंडेनी केलंय१९८५ ते १९९० दरम्यान जन्मलेल्या  ग्रामीण भागातील प्रत्येक युवक युवतीने अनुभवलेला काळ TDM पाहताना अक्षरशः पुन्हा जगायला मिळतोपॅरेगॉन चप्पलचा अंगठा बसवनेब्लेडने वर्तमान पत्रातील हिरॉईनची कात्रणे कापणेकॅसेट मधला रिल हाताच्या बोटाने फिरवणेचिरगुटातल्या भाकरीला लागलेल्या मुंग्यापायातला कुरूप झालेला काटा काढताना मेणाला दिलेला चटकाथुका लावून सायकलचा वॉलचेक करणेजखमेवर दगडी पाला लावणेलग्नात कुरवला म्हणून मिरवणेपत्रावळ्यावर जेवण करणेहे सिन्स अतिप्रचंड नॉस्टलॅजीया आहेत


निली कॉलेजला जाताना जेव्हा बाबू तिच्यावर झाड हलवुन पारिजातकाच्या फुलांचा अभिषेक करतो तेव्हा ती फुले आपल्या भूतकाळातल्या प्रितीवर पडतात आणि तेव्हाचा सुगंध आपसूकच थिएटरात दरवळू लागतोपुढे बाबू निलीला पेढा देताना जेव्हा ट्रॅक्टर ऑटो स्पीडवर त्याच्या मागे मागे चालत असतो तेव्हा तो त्याच्या जीवलग मित्राची जागा भरुन काढतोया सीनमध्ये दिग्दर्शक भाऊंनी चक्क ट्रक्टरला सुद्धा अभिनय करायला भाग पाडलायजुन्या प्रेमगीतांच्या आणि दिलवाले चित्रपटाच्या डायलॉगच्या साहाय्याने बाबूने नीलीवर लाईन मारतानाचा प्रत्येक शॉट जब्राट जमलायदोस्ता इंद्रभानतुला तर लेका तू व्हिलन हायेस हे सांगायची गरजच नाय ठेवलीस इतका रॉ दिसला आहेस हातात खोऱ्याचा दांडा घेवून येतानाविनायक पवारांची गीतंओंकारस्वरूप आणि नंदेशजींचा आवाजविरधवलची सिनेमॅटोग्राफी आणि संकेतची एडीटींग या सगळ्यांनी TDM ला कसं एकदम वजनात ठेवलंयमुख्यकलाकारांसह सर्व सहकलाकारांनीसुद्धा बाप अभिनय केलाय


चित्रपटात किंचितही अंगप्रदर्शन नसताना कालिंदीचे सौंदर्य पडदा व्यापून टाकते त्यात भरीस भर म्हणून खंडोबाच्या देवळात जेव्हा ती निळ्या साडीवर नाचते तेव्हा बानू आणि म्हाळसालाही तिचा हेवा वाटेल इतकी ती मोहक दिसतेतसंच विहिरीत होल घेताना गावाकडच्या गरीब घरात चटणी भाकरीवर पोसलेला आमच्या पृथ्वीची सिक्स पॅकची स्टील बॉडी ब्रुसलीची आठवण करुनदिल्याशिवाय राहत नाहीदिग्दर्शकाची भूमिका सांभाळता सांभाळता भाऊरावांनी सुद्धा प्रत्येक गावातल्या राजकारणात असलेल्या एका आगलावी माणसाची भूमिका सोसायटीच्या मेंबरच्या माध्यमातुन अतिशय उत्तम वठवली आहेगाव पातळीवरचे राजकारण आणि निवडणुकांसह

ग्रामीण संस्कृती आणि परंपरांचे अप्रतिम वर्णन करण्यात ते यशस्वी झालेतफक्त शेवटी एकच खंत वाटते की TDM चा दोन भागाचा जर एकच भाग करुन बाबूचा टॉप गिअरपण याच भागात दाखवता आला असता तर भारी झालं असतंबाकी TDM बद्दल अजुन बरंच काही सांगण्यासारखं आहे ते भाऊंना आणि टिमला निवांत भेटून सांगेन.`आयुष्याची लढाई पळून नाही जिंकता येत’ पिच्चरमधला हा डायलॉग भाऊरावांनी TDM च्या माध्यमातुन खरा करुन दाखवला त्याबद्दल त्यांचे कौतुक


TDM अजुन दोन दिवस थिएटर मधे असेल म्हणून पिच्चरवरुण घरी आल्या आल्या रात्री १२:३० ते :०० हे लिहीत बसलो होतो जेणेकरुन उरलेल्यांनी तरी तो पाहावाकाळाच्या पोटात गुडूप झालेल्या जुन्या आठवणी पुन्हा अनुभवण्यासाठी TDM ची OTT वर येण्याची वाट  बघता तो थिएटरात जाऊन नक्की बघाआजवर सामान्य माणसेच अभिनेत्यांना स्टार आणि सुपरस्टार करीत आली आहेत मग त्याच सामन्यातून आलेल्या पृथ्वीराज थोरात आणि कालिंदी निस्तानेचा सुद्धा स्टार होण्याचा हक्क आहेचदोस्तांनोकमाल काम केलंय तुम्हीखरंच आज रात्री जर मला TDM पाहायला मिळाला नसता तर आपल्याच दोस्तांनी तयार केलेल्या एका सुंदर कलाकृतीला मी मुकलो असतो त्याबद्दल गोल्डन सिनेमॅक्सचे संचालक श्री.गाढवे आणि थिएटरचे कर्मचारी कृष्णासूरज  संतोषचेमनापासून आभार आणि हा सोबतचा फोटो क्लिक केल्याबद्दल हनुमंतला धन्यवाद.


प्रा.विशाल गरड

१३ जून २०२३पांगरी




1 comment:

गुलीगत सुरजचा विजय असो !

निर्विवाद, निखळ आणि निरागस विजय !  ना मी बिग बॉस पाहिला, ना मी कुणाला मतदान केलय. त्याचे कारण असे की मी मुळात टीव्हीच फार कमी पाहतो. महत्वाच...