Saturday, June 17, 2023

आदिपुरूष

ओम भावाखरंच याची गरज होती का ? होतीच तर मग सत्ययुगाला कलियुगाच्या काळ्या पाण्यात बुडवून तू काय साध्य केलेस ? आदिपुरूषने रामायणाची गोष्ट अजुन मोठी झाली का खोटी ? लका सहाशे कोटी बजेटमधे तर आम्ही पन्नास साठ पिच्चर करुन मोकळंझालं आसताववर्षानुवर्ष जे रामायण मनावर छापलं गेलंय त्याला सिनेमॅटिक लिबर्टीच्या नवाखाली हॉलिवुड चित्रपटांच्या सुपरहिरोंच्या भेळमिसळीने तू सुरंग लावलासज्या VFX वर एवढा खर्च करण्यात आलाय ते प्रत्यक्षात मात्र ऍनीमेशनपटापेक्षाही साधारण झालंय


हे जरी कलियुगातले रामायण असले तरी मुळव्याध झाल्यासारखा चालणारा रावणएका लाईनमधे दहा तोंड बसत नाहीत म्हणूनत्यांची दोन लाईनमधे केलेली अलाइनमेंटफ्लॅशची कॉपी असलेला टॅटूवाला इंद्रजीतहनुमानजींची दाढीप्रभू श्रीरामाच्या मिशारावणाची केशभूषाकाळी लंका आणि पात्रांचे हास्यास्पद डायलॉग बुद्धीला पटले नाहीत


रामायण म्हणजे जर कोकिळेचा मंजूळ आवाज असेल तर त्यावर आधारित आदिपुरूष चित्रपटाला तू वटवाघुळ करुन ठेवलंससंपूर्ण चित्रपटात जर मला काय आवडले असेल तर ते आपल्या अजय-अतुलचे संगीतगाणी आणि बीजीएमअख्खा पिच्चर बीजीएमने जणू खांद्यावर उचलून घेतलातबाकी `जय श्रीराम’ हे देवरसाने परिपूर्ण असलेले अतिशय प्रेरणादाई गाणे तू आदिपुरूषच्या निमित्ताने आम्हाला दिल्याबद्दल आम्ही तुझे कायम ऋणी राहू.


विशाल गरड

१६ जून २०२३धाराशिव




No comments:

Post a Comment

गुलीगत सुरजचा विजय असो !

निर्विवाद, निखळ आणि निरागस विजय !  ना मी बिग बॉस पाहिला, ना मी कुणाला मतदान केलय. त्याचे कारण असे की मी मुळात टीव्हीच फार कमी पाहतो. महत्वाच...