Thursday, October 22, 2026

गोष्ट एका स्वप्नपूर्वीची

सन २०१० साली मी पहिल्यांदा अकलूजला गेलो होतो तेव्हा स्मृतीभवनजवळून जाताना माझ्या सोबतच्या सहकाऱ्याने सहज सांगितले होते की “ही बघ ही हितलं लय मोठं सभागृह हाय. आरं हितं लय मोठं मोठं कार्यक्रम व्हत्यात. हजार दिड हजार माणूस मावतंय ह्यात. लय दिग्गज माणसं ह्या सभागृहात बुलुन गेल्याती बाबा. सहकारमहर्षी शंकरराव मोहिते पाटलांच्या नावानं आसलेल्या या स्मृतीभवनला लय मोठा ऐतिहासिक वारसा हाय. ह्यवढं मोठ्ठं सभागृह आपल्या जिल्ह्यातच न्हाय तर अख्खा राज्यात सुद्धा नसल.”

त्याने सांगितलेली ही माहिती ऐकूनच स्मृतीभवनबद्दल नेहमीच माझ्या मनात आकर्षण राहीलं होतं. पुढे प्रबोधन क्षेत्रात काम करत असताना राज्यासह देशाच्या अनेक नामवंत सभागृहाच्या भिंतीवर माझे शब्द उमटले असतील पण स्मृतीभवनमधे जाण्याचा योग कधी आला नव्हता परंतु आज तब्बल १६ वर्षांनी हेच स्मृतीभवन मला ऐकण्यासाठी आलेल्या श्रोत्यांनी भरून ओसंडून वाहिलं हे पाहून मन कृतार्थ झालं.


महाराष्ट्राच्या सांस्कृतिक इतिहासात आजही अकलूजच्या स्मृतीभवनचे नांव सुवर्ण अक्षरांनी अधोरेखित आहे. या व्यासपीठाने अनेक दिग्गज कलाकार आणि वक्ते घडवले आहेत. या लोकव्याख्यानकाराचे शब्द ऐकण्यासाठी एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्याबद्दल समस्त अकलूजकरांचे आणि इतकं भव्य आणि दिव्य लोकव्याख्यान आयोजित केल्याबद्दल शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, जिजामाता कन्या प्रशालेचे सहृदयपूर्वक आभार. 


विशाल गरड (लोकव्याख्यानकार)

२१ ऑक्टोबर २०२६, स्मृतीभवन अकलूज.

No comments:

Post a Comment

गोष्ट एका स्वप्नपूर्वीची

सन २०१० साली मी पहिल्यांदा अकलूजला गेलो होतो तेव्हा स्मृतीभवनजवळून जाताना माझ्या सोबतच्या सहकाऱ्याने सहज सांगितले होते की “ही बघ ही हितलं लय...