Tuesday, May 14, 2024

होर्डिंग

काल मुंबईतील घाटकोपर येथे होर्डिंग कोसळ्याची बातमी बघून धक्काच बसला. तसेही जिथे बिल्डिंग आणि फ्लायओव्हर ढासळू शकतात तिथे होर्डिंग्ज काय चीज आहे. पण साला या होर्डिंग्जची सुद्धा ना शहरा शहरात एक वेगळीच स्पर्धा चालू झालिये. त्याची भव्यता, लाइटिंग, आकर्षता आणि लोकेशन यासाठी ईरीशिरी सुरू आहे. मुंबई पुण्यासह देशभरातील सगळ्याच दशलक्षी लोकसंख्या असलेल्या शहरात ही बलाढ्य, अतिभव्य होर्डिंग्ज बघायला मिळतात. त्यावर मोठाले फोकस आणि लक्ष वेधून घेणारा कंटेंट असतो.


९९ % होर्डिंग्ज हे रोडच्या लगतच असतात जेणेकरुन येणाऱ्या जाणाऱ्या वाहनचालकांना ते दिसावेत. काही काही महाभाग तर त्यावरील आघाडीच्या अभिनेत्रींचे आणि मॉडेलचे आकर्षक फोटो बघत बघत पुढच्याला धडकतात सुद्धा. आपल्याकडे जीव गेल्याशिवाय विषयाचे गांभीर्य लक्षात येत नाही. घ्या मग घेतलाय आता होर्डिंग्जने जीव, करा जरा गांभीर्याने विचार. मी तर म्हणतो राज्यातील सर्वच शहरातील अनधिकृत आणि घातक हॉर्डिंग्स काढण्यासाठी तुकाराम मुंडे जिथे कुठे असतील तिथून दुसऱ्या मिनिटाला संबंधित विभागाची त्यांना नियुक्ती द्यायला हवी. आजपर्यंत जाहिरात कंपन्यांनी मनमानी होर्डिंग्ज उभे केले. रोडच्या कडेला मोठी झाडे असली तर ती पावसाळ्यात पडू शकतात म्हणून तोडणारे, होर्डिंग्जपण पडू शकतात म्हणून ते काढणार आहेत का नाहीत ? 


विशाल गरड

१४ मे २०२४, मुंबई




No comments:

Post a Comment

गुलीगत सुरजचा विजय असो !

निर्विवाद, निखळ आणि निरागस विजय !  ना मी बिग बॉस पाहिला, ना मी कुणाला मतदान केलय. त्याचे कारण असे की मी मुळात टीव्हीच फार कमी पाहतो. महत्वाच...