मी "मराठा" या शब्दाला जात मानत नसुन तो जगण्याचा एक अंगार आहे. मराठा हा शब्द प्रत्येकाच्या मनात एक स्पुल्लींग पेटवतो. मराठा हा तिनच अक्षरांचा समुह जो जगण्याची दिशा दाखवतो.
मरा मातीसाठी, राठ बना स्वसंरक्षणासाठी, ठार करा दहशतवाद्यांना, ठाम रहा पाठीशी, राम असुद्या आदर्श, हा सगळा बोध मला म रा ठा या तिन अक्षरांच्या जोडणीतुन होतो.
कोपर्डी येथील घटनेच्या निषेधार्थ आणि मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सबंध महाराष्ट्राभर निघत असलेले मराठा क्रांती मोर्चे हे मराठ्यांच्या स्वयंशिस्तीचे एक सर्वोत्तम उदाहरण आहे.
लाखो लोक एकत्र येत आहेत तेही व्यवस्थेला कसलाही त्रास न देता आणि एकही शब्द न उच्चारता. आता याच लाखोंच्या हातात ढाली आणि तलवारी येऊ नयेत हि जबाबदारी शासनाचीच आहे. कारण या मोर्च्यातील सर्व मागण्या शासनाकडे आहेत. काही ठरावीक समाजकंठकांचा विषारी प्रचार जर सुरू झाला तर मग त्यातुन उसळलेल्या दंगली, कत्तली आणि रक्ताचे सडे महाराष्ट्राला नविन नसतील.
हे मोर्चे मराठा आरक्षण व ईतर मागण्यांसोबतच मराठा समाजाच्या आजवरच्या अधोगतीला कारणीभुत ठरलेल्या प्रस्थापितांविरोधातही आहेत. म्हणुनच एवढा मोठा लाखोंचा जनसमुदाय नेत्यांना वगैरे न जुमानता स्वयंप्रेरणेने एकत्र येत आहे. आजवर ज्यांनी मराठ्यांना गृहीत धरूण राजकारण केले, फक्त शिवरायांचे नांव घेऊन राजकारण केले त्या सर्वांचा राग या मोर्च्याच्यामाध्यमातुन व्यक्त होत आहे, कारण आजवरची सर्वाधीक सत्ता मराठ्यांच्याच हातात असतानाही त्याच समाजातील बहुतांश मराठे मागासलेलेच राहीले हे दुर्देव.
तत्कालिन मराठाद्वेशी माणसांनी मराठा कधीच एकत्र येऊ नये म्हणुन आपल्यातच ईतर पोटजाती आणि प्रकार पाडले. आपल्या पुर्वजांपासुन आजवर आपणही ते पोसले. तु त्यांचा पाहुणा; का आमचा पाहुणा, आसल्या फालतू गोष्टीवर सोयरीकी केल्या. अरे लग्न करण्यासाठी योणी असलेली एक स्री लागते आणि शिश्न असलेला एक पुरूष लागतो. परंतु त्यातही खोलवर जाऊन पोटजाती शोधणाऱ्या अवलादींनी मराठा या शब्दातच विभाजन करून ठेवले. म्हणुनच आजवर मराठा समाज विखुरलेला राहीला.
आपला जन्म हि तर एक नैसर्गीक प्रक्रिया झाली. यातुनच आई आणि वडीलांच्या मिलनातुन निर्माण झालेले आपण; सर्वात आधी माणसाचं पिल्लु असतो परंतु आपण जन्मल्यानंतर आपल्यावर जे संस्कार होतात त्यावरूनच आपली जात ठरते. आजवर ज्या-ज्या मातेनं तिच्या लेकरावर लढाईचा, युद्धाचा, क्षत्रियाचा, छत्रपती शिवरायांच्या विचारांचा आणि मातीसाठी मरण्याचा संस्कार केला तो हरएकजण "मराठा" आहे मग तो कोणत्याही जाती धर्मातला असो.
युद्धाचा संस्कार असलेल्या मराठ्यांनी बुद्धाच्या संस्काराप्रमाणे शांततेत मोर्चे काढणे हे तथागत गौतम बुद्ध आणि भारताच्या संविधानाप्रती आदर दर्शवते. अशा परिस्थितही दलित-मराठा संघर्ष व्हावा म्हणुन प्रयत्नशील असणाऱ्या काही अवलादी ठेचुन मारल्या पाहीजेत.
तु देशमुख, तु पाटील , तु अक्करमाशी , तु बारामाशी, तु कमी पैक्याचा, तु जास्त पैक्याचा, तु बॅन्नव कुळी, तु शह्यान्नव कुळी, तु लेवा पाटील, तु हालका पाटील, असली जळमटं फेकुन देऊन फक्त मराठा या एका शब्दाखाली एकत्र येऊयात.
एक गोष्ट लक्षात ठेवा दोस्तहो,
"अरे हालकं भारी या वस्तु असतात, माणसं नाही" हे माझं वाक्य समाजातील सर्व जातीपातींसाठी आहे.
चलातर मग मराठा क्रांती मोर्च्यात सहभागी होऊयात आणि पुन्हा एक इतिहास घडवुयात.
एक मराठा, लाख मराठा.
जयोस्तु मराठा !
लेखक : प्रा.विशाल गरड (पांगरीकर)
दिनांक : २0 सप्टेंबर २०१६
वेळ : सायंकाळी ५ ते ६
No comments:
Post a Comment