काल सक्रात व्हती. पुरणपोळ्याचा सयपाक आन् तिळगुळ खाऊन-खाऊन त्वांड ग्वाड झ्यार पडलं व्हतं. आज कालेजला निघाल्यावर आई चुलिवर भाकऱ्या भाजताना दिसली. रोज थोडा का हुईना पण नाष्टा करूनच कालेजला जात असतुय मी. पण आज फकस्त भाकऱ्याच झाल्या व्हत्या; भाजीला जरा टायम व्हता पण मला जायची गडबड, तेवढ्यात आई मनली "आरं थांब की भाजी करते, थ्वाडा तरी दम हाय का रं तुज्या जिवाला...नाहीतर जाऽऽ मग मुटका खाऊन" आईचा पर्याय झ्याक व्हता. म्या बी लगीच सयपाक घरात जाऊन समदं डबं आईपशी आणलं. टम फुगल्याली भाकरी आरावरून काढली आन् आईला मुटका कराय लावला.
भाकरीचा मुटका माझ्या लई आवडीचा परकार हाय. "पसरल्याली गोष्ट जवा गोळा व्हती तवा तिला 'मुटका' म्हणत्यात" हि डिफीनीशन माजी म्याच तयार केल्याली हाय. ह्यो शब्द तसा लईच कमी वापरत्यात पण पवायला गेल्यावर मुटक्याबीगीर मज्याच नाही. ह्ये आपलं पसराट शरिर गोळा करून उचावरून हिरीत उडी हाणायची आण मग हिरीच्या कोरड्या दगडाला पाण्याच्या शितुड्यांनी चिंबाट करून टाकायचं. आसाच असतोय भाकरीचा मुटका; चुलिच्या आरावर भाजलेल्या भाकरीचा पापुडा काढुन त्येच्यावर तेल मिठ आन् शेंदाण्याची चटणी टाकुन चिंबाट करून टाकायचा आन् मग बाजुला काढल्याला खमंग पापुडा झाकुन भाकरीचा मुटका करायचा म्हंजी गोल रोल करायचा. ना भाजीची गरज ना आमटीची फकस्त मुटका जिंदाबाद. आईनं केलेल्या आखंड एका भाकरीचा आपुट मुटका म्हंजी एक जेवणंच म्हणायचं चार पाच तास तर भुक नाय लागत. ह्यो आसला रानटी आहार खातुय म्हणुनच भिंगरीसारखा फिरतुय नाहीतर म्हागंच इंजन काम निघालं आसतं.
कायबी मना पण आईच्या हातच्या भाकरीच्या मुटक्यापुढं नाष्ट्याचं समदं परकार फिक्काट हायत बगा....
लेखक : प्रा.विशाल गरड (पांगरीकर)
दिनांक : १५ जानेवारी २०१७
वेळ : सायंकाळी ४ ते ४:३० वाजता
Wow...Nice sir
ReplyDeleteThis comment has been removed by the author.
ReplyDeleteपसरल्याली गोष्ट जेंव्हा एकत्र होती तेव्हा तिला "मुटका"म्हनत्यात..👍🏼
ReplyDeleteसुपरब मुटका🍪 आईच्या हातचा...👌🏼
लहानपन आठवले.....
पसरल्याली गोष्ट जेंव्हा एकत्र होती तेव्हा तिला "मुटका"म्हनत्यात..👍🏼
ReplyDeleteसुपरब मुटका🍪 आईच्या हातचा...👌🏼
लहानपन आठवले.....
पसरल्याली गोष्ट जेंव्हा एकत्र होती तेव्हा तिला "मुटका"म्हनत्यात..👍🏼
ReplyDeleteसुपरब मुटका🍪 आईच्या हातचा...👌🏼
लहानपन आठवले.....