Saturday, December 23, 2023

चिलट

आज सांच्यापारी रानातून घरी येताना एक चिलाट खापकन डोळ्यात घुसलंलगीच डोळा चुळीत चुळीतच म्या गाडी साईडला घितलीचिलटाला जित्ता डोळ्याबाहिर काढायसाठी वाडुळ झटलो पण ते डोळ्यात गेल्या गेल्याच मेलं व्हतंह्ये आसलं मायंदाळ व्हतंय म्हणुंशान गॉगल असतंय डोळ्याला पण त्योबी नेमका आजच घरी ऱ्हायला आन हे चिलाट हाकनाक मेलंत्येलाबी माहित नसल पुढून गाडी यील आन मलाबी माहीत न्हवतं पुढून ती यीलएवढ्या मट्या पिरतमीवर ह्या बोटावर जीव सुडून पडल्याल्या ह्या चिलटाची कुठं गणती व्हइल का ?


आवं ही चिलाट काय आन माणूस कायऊगं जमिनीवर थोडं वरीस फिरायला आल्याली पाव्हणं हायतीएकदा का दिस भरलं की आसच चिलटासारखं मरून जायचंयतवा आजचा दिस आपला म्हणून जगा लेकानोसगळं उद्या उद्या करत बसलाव तर जगायचं ऱ्हाऊन जाईलही चिलटाची बॉडी रस्त्याच्या कडंला कुठं पडली आसल ह्यजी कोण नोंद ठिवील का ? आरं ह्या भर्मांडात माणूसबी एक चिलाट हायजवा जवा त्यो निसर्गावर चढाई करल तवा तवा निसर्गबी ह्या चिलाटासारखी माणसं मारील; मग दोष देणार कुणाला ?


विशाल गरड

२३ डिसेंबर २०२३पांगरी




Saturday, December 16, 2023

तोड - पोस्टर रिलीज

 एवढ्या सगळ्या धबडग्यात माझ्यासारख्या पामराने अजून काय काय करावं. तरीबी स्वतःमधला दिग्दर्शक आणि अभिनेता जिवंत ठेवण्यासाठी मेंदूच्या काही न्युरॉन्सला गुत्त देवून ठेवलंयमी व्याख्यानातलिखाणातचित्रकलेतकॅलिग्राफित कितीही बिझी असू द्यानवनवीन विषयांवरील पिच्चरची स्टोरी डोक्यात सुरुच असतेत्यापैकीच ‘दैना’ आणि ‘बुचाड’ नंतरची माझी पुढील कलाकृती म्हणजेतोड”. गेल्या वर्षी याच महिन्यात आम्ही चित्रीकरण सुरू केले होतेतोडच्या संपूर्ण शूट पैकी सुमारे सत्तर टक्के शूट आम्ही अवघ्या तीन दिवसांत पूर्ण केले पण नंतर काहीच सीन साठी जवळपास चार पाच महिने लागलेएडीटींगलाही मग मिळेल तसा वेळ देवून बसू लागलोसरतेशेवटी ऊसतोड कामगारांचे आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे वास्तव मांडणारा तोड पूर्ण झालायएकाने लिहिलेल्या गोष्टीवर जेव्हा सर्वजण काम करतात तेव्हाच पिच्चर तयार होतोतोडच्या संपूर्ण टीमने घेतलेल्या जीवतोड मेहनतीमुळे माझ्या मनातल्या गोष्टीला मुर्त स्वरूप प्राप्त होवू शकले त्याबद्दल त्या सर्वांचे आभार


या लघुचित्रपटाची पहिली स्क्रिनिंगही आम्ही काही दिवसांपूर्वीच ऊसतोड मजुरांच्या पाड्यावर जाऊन केलीलवकरच त्याचा व्लॉग यूट्युबवर टाकेन पण तूर्तास हे आमच्या तोडचे प्रोमोशनल पोस्टर मी तुमच्या स्वाधीन करीत आहेलघुचित्रपटाबद्दल त्याच्या निर्मितीच्या आणि चित्रीकरणाच्या प्रवासाबद्दल डोंगरभर गोष्टी आहेतहळू हळू मी त्या सांगणारच आहे पण तूर्तास माझ्या आयुष्यातला हा तिसरा लघुचित्रपट राज्यातील आणि देशातील विविध फिल्म फेस्टिव्हलमधे जाण्यास सज्ज झालायलवकरच आणखीन काही स्पेशल स्क्रिनिंग करण्याचाही आमचा मानस आहेप्रिय रसिक श्रोतेहोतुमच्या आभाळभर प्रेमातला ढगभर गारवा जरी ‘तोडला मिळाला तरी ही कलाकृती बुचाडचेही रेकॉर्ड तोडेल अशी आशा आहे


विशाल विजय गरड

(लेखक,दिग्दर्शक,अभिनेता : तोड)






Wednesday, December 13, 2023

टॅक्टरचा नाद

टॅक्टरवरची ही जागा म्हंजी जणू बरक्यापणीचं आमचं  सिंव्हासनच व्हतंसुट्ट्याला कधी शेलगावच्या लता मावशीकड गेलाव की घरात पिशवी टेकवायच्या आधीच दारात असलेल्या ह्या टॅक्टरवर बसायला तरफाडायचाव आमीतवा आमच्या पावण्या रावळ्यात जास्त कुणाकडं वाहणं नव्हती म्हणून मग टॅक्टर हीच समद्यात आवडीचं वाहन आसायचं. “आमच्या मावशीच्या घरी टॅक्टर हाय” आसं सांगायलाबी आभिमान वाटायचाकदी कदी टिरिंगवर बसून ती फिरवत फिरवत ब्रिइऽऽऽमब्रिइऽऽऽम आवाज काढताना टॅक्टर चालीवल्याचा आनंद मिळायचा.


आमचा मावस भाऊ बापू न्हायतर तात्या जर कदी टॅक्टर घिऊन निघाले तर मग आमची एक चक्कर फिक्स आसायचीत्यात बापू म्हणायचा “ पोरांनोगच्चीम धरा दांड्याला न्हायतर ट्रायलीच्या चाकाखालीच जाचाल बगा” धडाडांग व्हतडांग करत एक चक्कर मारली की आमी मग ईळभर हुंदडायला रानात रिकामं व्हायचावएकदा मला सायकल पायजेल म्हणून आमच्या उत्तम काका ऊर्फ भऊनी त्येंची एक जुनी सायकल नीट करून शेलगावपसून पांगरीपस्तोर चालवीत आणली व्हतीतवा त्या सायकलवर शायनिंग मारत म्या आणलेली पहिली चक्कर अजूनबी ध्यानात हाय


आता मावशी गेल्यापसून लय काय जाणं व्हत नाय पण काल लय दिसांनी शेलगावला गेल्यावर रानात धक्क्याला लावून ठिवल्याला त्योच टॅक्टर बघितला आन त्येच्या मडगार्डवर बसून फुटू काढायचा मोह मला न्हाय आवरलाआज जरी फोर्ड मधी फिरत आसलो तरी लहानपणी हितं बसून फिरायचा आनंद काय औरच व्हताबारक्यापणी लै छोट्या-छोट्या गुष्टीत म्होटा-म्होटा आनंद व्हता पण म्होट्ट झाल्यावर आसल्या छोट्या छोट्या गुष्टी आठिवण्यात आन जपण्यातसुदा तितकाच आनंद आसतंय म्हणूनच ह्यो फुटू काढून त्येज्यावर शबुद शिपडल्यात


विशाल गरड

१३ डिसेंबर २०२३शेलगाव (जहागीर)



गुलीगत सुरजचा विजय असो !

निर्विवाद, निखळ आणि निरागस विजय !  ना मी बिग बॉस पाहिला, ना मी कुणाला मतदान केलय. त्याचे कारण असे की मी मुळात टीव्हीच फार कमी पाहतो. महत्वाच...