एवढ्या सगळ्या धबडग्यात माझ्यासारख्या पामराने अजून काय काय करावं. तरीबी स्वतःमधला दिग्दर्शक आणि अभिनेता जिवंत ठेवण्यासाठी मेंदूच्या काही न्युरॉन्सला गुत्त देवून ठेवलंय. मी व्याख्यानात, लिखाणात, चित्रकलेत, कॅलिग्राफित कितीही बिझी असू द्या. नवनवीन विषयांवरील पिच्चरची स्टोरी डोक्यात सुरुच असते; त्यापैकीच ‘दैना’ आणि ‘बुचाड’ नंतरची माझी पुढील कलाकृती म्हणजे“तोड”. गेल्या वर्षी याच महिन्यात आम्ही चित्रीकरण सुरू केले होते. तोडच्या संपूर्ण शूट पैकी सुमारे सत्तर टक्के शूट आम्ही अवघ्या तीन दिवसांत पूर्ण केले पण नंतर काहीच सीन साठी जवळपास चार पाच महिने लागले. एडीटींगलाही मग मिळेल तसा वेळ देवून बसू लागलो. सरतेशेवटी ऊसतोड कामगारांचे आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे वास्तव मांडणारा तोड पूर्ण झालाय. एकाने लिहिलेल्या गोष्टीवर जेव्हा सर्वजण काम करतात तेव्हाच पिच्चर तयार होतो. तोडच्या संपूर्ण टीमने घेतलेल्या जीवतोड मेहनतीमुळे माझ्या मनातल्या गोष्टीला मुर्त स्वरूप प्राप्त होवू शकले त्याबद्दल त्या सर्वांचे आभार.
या लघुचित्रपटाची पहिली स्क्रिनिंगही आम्ही काही दिवसांपूर्वीच ऊसतोड मजुरांच्या पाड्यावर जाऊन केली. लवकरच त्याचा व्लॉग यूट्युबवर टाकेन पण तूर्तास हे आमच्या तोडचे प्रोमोशनल पोस्टर मी तुमच्या स्वाधीन करीत आहे. लघुचित्रपटाबद्दल त्याच्या निर्मितीच्या आणि चित्रीकरणाच्या प्रवासाबद्दल डोंगरभर गोष्टी आहेत. हळू हळू मी त्या सांगणारच आहे पण तूर्तास माझ्या आयुष्यातला हा तिसरा लघुचित्रपट राज्यातील आणि देशातील विविध फिल्म फेस्टिव्हलमधे जाण्यास सज्ज झालाय. लवकरच आणखीन काही स्पेशल स्क्रिनिंग करण्याचाही आमचा मानस आहे. प्रिय रसिक श्रोतेहो, तुमच्या आभाळभर प्रेमातला ढगभर गारवा जरी ‘तोड’ला मिळाला तरी ही कलाकृती बुचाडचेही रेकॉर्ड तोडेल अशी आशा आहे.
विशाल विजय गरड
(लेखक,दिग्दर्शक,अभिनेता : तोड)
खुप खुप शुभेच्छा फॉर "तोड".❤️❤️
ReplyDeleteपोष्टर तर लय गॉड हाय बगा सरजी
ReplyDeleteBest Luck
ReplyDeleteखूप खूप शुभेच्छा सरजी.....
ReplyDeleteतोड खूप खूप शुभेच्छा सरजी
ReplyDeleteMany Congratulations sirjee...
ReplyDeleteThis comment has been removed by the author.
ReplyDeleteThis comment has been removed by the author.
ReplyDeleteAll the Best
ReplyDeleteall the best
ReplyDeletePoster is really nice 👍 Best wishes for your new blog TOD (तोड)💐🎉
ReplyDeleteAll the best of luck sir ji
ReplyDelete