Wednesday, August 30, 2023

मैलाचा दगड

आपण आपलं काम प्रामाणिकपणे करत राहायचेएक मोठी संधी आयुष्याच्या एका टप्प्यावर तुमची वाट पाहत उभी असतेकुणीतरी दूरवरून आपली निरीक्षणे नोंदवत असतोयोग्य वेळ आली की तुमच्यातला हुनर ओळखून आपसूक तुमच्यासाठी रेड कार्पेट अंथरलं जातंआजवर हजारो व्याख्याने झालीतगावतालुकाजिल्हामेट्रो सिटीमंदिरबौद्ध विहारमस्जिदशाळामहाविद्यालये अशा अनेक ठिकाणी व्याख्याने केलीतपण येत्या १ सप्टेंबर २०२३ रोजी प्रथमच कॉर्पोरेट कंपनीसाठी मायक्रोसॉफ्ट टिम्स मार्फत ऑनलाइन व्याख्यान देणार आहे.


काही दिवसांपूर्वी जापा इंडिया कंपनीचा फोन आला आणि त्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी फार्म कनेक्ट सेशनमार्फत `Team Victory : Lessons from Chatrapati Shivaji Maharaj’ या विषयावर मार्गदर्शनासाठी मला निमंत्रित केलंअर्थात या निमंत्रणाकडे मी एक मोठी संधी म्हणून पाहतोयवक्तृत्वाच्या साधनेचं मी एक तप पूर्ण केलंयआता माझ्याकडे असलेल्या वक्तृत्व आणि लेखन कौशल्याचा फायदा जर कंपनीला त्यांच्यासाठी राबणाऱ्या हातांचा उत्साह वाढवण्यासाठी होणार असेल तर भविष्यात माझ्यासाठी हा मैलाचा दगड ठरेल हे नक्की.


संधी कोणतीही असू द्या मी ताकदीने उभा असतोचकंपनीने टाकलेल्या जबाबदारीचे सोने करण्याचा प्रयत्न असेलतुर्तास तरी अभ्यास जोरात सुरू आहेआरंभ है प्रचंड


विशाल गरड

३० ऑगस्ट २०२३पांगरी




Sunday, August 27, 2023

सुभेदार तानाजी मालुसरे

 `आमच्या प्रेतांच्या पायऱ्या रचाव्या लागल्या तरी चालेल पण कोंढण्याच्या पायरीला आऊसाहेबांचे पाय लागायला पाह्यजेल’ या एका प्रतिज्ञेवर सुभेदारांसह साडेतीनशे मावळ्यांनी कोंढण्यावर दिलेलं बलिदान इतिहासात अजरामर आहेकोंढण्याचा रणसंग्राम याआधी तानाजी आणि हर हर महादेव या दोन चित्रपटांतून दाखवला गेलायगोष्ट तीच आहे जी आपल्या सर्वांना लहानपणापासूनच माहीत आहे तरीही ती सादर करण्याची पद्धत प्रत्येकाची वेगळी असते म्हणून सुभेदारही तुम्ही पाहायलाच हवा.


सर्वच पात्रांच्या जवळ घेवून जाणारी चित्रपटातली वेशभूषा आणि शिवकालीन भाषेत घट्ट रुतलेला अभिनय अतिशय सुंदर झालायअजय पुरकर हा नट जणू शिवरायांनीच खास त्यांच्या मावळ्यांच्या भूमिका अजरामर करायला पृथ्वीवर धाडला असावा इतक्या प्रचंड कष्टाने त्यांनी भूमिकेला न्याय दिलायश्री शिवराज अष्टकांतील आजवरचे चारही भाग मी पाहिलेत एक शिवभक्त म्हणून त्या कलाकृती पाहाणं मी कर्तव्यच समजतोपरंतु पाचव्या भागासाठी माझे प्रिय मित्र श्रमिक गोजमगुंडे सहनिर्माता असल्याने हा भाग आपसूकच जवळचा होवून गेलेला.


दिग्पाल सरांच्या सर्वच टिमचं शुटींग करत असतानाचे शिवकालीन पात्रांसंदर्भात असलेलं समर्पणते पाळत असलेली आचार संहिताशिवरायांवरील श्रद्धा या गोष्टी आपसूकच चित्रपटांत उतरतात शिवचरित्र ही जशी पुन्हा पुन्हा ऐकण्याचीअनुभवण्याची गोष्ट आहेत तशीच ती पुन्हा पुन्हा पाहण्याची सुद्धा आहेजसे संत तुकारामांचे अभंग कितीही वेळा ऐकले तरी जुने होत नाहीत तसंच सुभेदार तानाजी मालुसरेंचा पराक्रम कितिंदा जरी पाहिला तरी पुन्हा पुन्हा अंगावर काटा येतोच.


राजे जेव्हा तानाजी मालुसरेंच्या कमरेला सुभेदारपदाची तलवार बांधतातआग्र्याहून सुटून राजगडावर येवून राजे जेव्हा माँसाहेबांच्यापायावर डोके ठेवतातबेलभंडारा हातात घेवून जेव्हा सुभेदार `आधी लगीन कोंढण्याचं मग रायबाचं’ ही शपथ घेतात तेव्हा आपसूकअंगावर शहारे उभारतातशेवटी उदयभानाला मारुन जेव्हा सुभेदार शिवरायांच्या कुशीत जीव सोडतात तेव्हा काळजाच्या खोलवर आलेला हुंदका डोळ्यातील अश्रूंना बाहेर येणास भाग पाडतो


या चित्रपटातील अलका कुबल यांनी साकारलेलं `जना गराडीन’ हे पात्र पाहिल्यावर मी त्याचा संबंद्य लगेच माझ्या आडनावाशी जोडला कारण पटलाच्या बायकोला जसे पाटलीन म्हणतात तसेच आमच्या घरातील स्त्रियांना सुद्धा गरडीन म्हणतातसुभेदार मधील गराडीन हे नाव खरंच शिवकालीन आहे की स्क्रिप्ट लिहिताना लेखकाने दिलंय हे दिग्पाल सरांना भेटल्यावर मी नक्की विचारेन


शेवटी एक विनंती,

चित्रपट तर सहकुटुंब थिएटर मधे जाऊनच बघा फक्त शेवटची दृश्य मोबाईलमधे रेकॉर्ड करुन व्हिडीओ स्टोरी वगैरे ठेवण्याचा मोह आवराअशाने नवीन प्रेक्षकांच्या उत्कंठेचा अतिउच्च बिंदू लोप पावतोबाकी महाराजांचे विचार त्यांच्या मुळ इतिहासाची तोडफोड न करता त्याला भव्यता प्रदान करण्याचा जो कोणी प्रयत्न करेल त्यांचा प्रत्येक शिवभक्ताला सदैव अभिमानाच वाटेलपुन्हा एकदा सुभेदारच्या सर्व टिमचे कौतुक आणि पुढील भागास शुभेच्छा


विशाल गरड

२७ ऑगस्ट २०२३पांगरी




गुलीगत सुरजचा विजय असो !

निर्विवाद, निखळ आणि निरागस विजय !  ना मी बिग बॉस पाहिला, ना मी कुणाला मतदान केलय. त्याचे कारण असे की मी मुळात टीव्हीच फार कमी पाहतो. महत्वाच...