माझे प्रिय मित्र श्रमिक गोजमगुंडे सहनिर्माता असलेला आणि दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी दिग्दर्शित केलेला श्री शिवराय अष्ठकातील `सुभेदार’ हा चित्रपट येत्या २५ ऑगस्ट २०२३ रोजी प्रदर्शित होत आहे. मुळात पावनखिंड पाहिलेल्या कुणालाच हा चित्रपट बघायला जावा असे म्हणण्याची गरजच पडणार नाही एवढा विश्वास पावनखिंडच्या टिमने प्रेक्षकांमध्ये पेरला गेलाय.
सुभेदार तानाजी मालुसरेंचा कोंढाण्यावरचा पराक्रम कितिंदा जरी पाहिला तरी तो पुन्हा पुन्हा ऐकावा वाटतो, पहावा वाटतो. काही चित्रपट असतात जे प्रदर्शित होण्याआधीच सुपरहिट होण्याची शाश्वती देता येते त्यापैकी सुभेदार एक म्हणता येईल कारण सिंहगड हा प्रत्येक पुणेकराचा मान, सन्मान आणि अभिमान आहे. महाराष्ट्र तर सोडाच पण नुसत्या पुणे शहराने जरी मनावर घेतले तरी सुभेदार हिट होईल यात शंका नाही.
गडकोट संवर्धनाचे श्रेष्ठ कार्य करणाऱ्या तसेच स्वराजातल्या गडकोट किल्यांना प्रवेशद्वार लावलेल्या सह्याद्री प्रतिष्ठानचे शिवकार्य अग्रणी आहे. सहयाद्रीचे मावळे महाराष्ट्रभर पसरले आहेत. इथल्या प्रत्येक शिवभक्तांसाठी सह्याद्री प्रतिष्ठानचे कार्य प्रेरणादाई आहे. आता पृथ्वीराज प्रॉडक्शनच्या माध्यमातून श्रमिक सरांनी उचललेले हे शिवधनुष्य आम्हा मित्रांसाठी नक्कीच अभिमानास्पद आहे. प्रिय श्रमिक सर आणि सुभेदारच्या संपूर्ण टिमला खूप खूप शुभेच्छा.
विशाल गरड
२३ ऑगस्ट २०२३, पांगरी
No comments:
Post a Comment