Wednesday, August 30, 2023

मैलाचा दगड

आपण आपलं काम प्रामाणिकपणे करत राहायचेएक मोठी संधी आयुष्याच्या एका टप्प्यावर तुमची वाट पाहत उभी असतेकुणीतरी दूरवरून आपली निरीक्षणे नोंदवत असतोयोग्य वेळ आली की तुमच्यातला हुनर ओळखून आपसूक तुमच्यासाठी रेड कार्पेट अंथरलं जातंआजवर हजारो व्याख्याने झालीतगावतालुकाजिल्हामेट्रो सिटीमंदिरबौद्ध विहारमस्जिदशाळामहाविद्यालये अशा अनेक ठिकाणी व्याख्याने केलीतपण येत्या १ सप्टेंबर २०२३ रोजी प्रथमच कॉर्पोरेट कंपनीसाठी मायक्रोसॉफ्ट टिम्स मार्फत ऑनलाइन व्याख्यान देणार आहे.


काही दिवसांपूर्वी जापा इंडिया कंपनीचा फोन आला आणि त्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी फार्म कनेक्ट सेशनमार्फत `Team Victory : Lessons from Chatrapati Shivaji Maharaj’ या विषयावर मार्गदर्शनासाठी मला निमंत्रित केलंअर्थात या निमंत्रणाकडे मी एक मोठी संधी म्हणून पाहतोयवक्तृत्वाच्या साधनेचं मी एक तप पूर्ण केलंयआता माझ्याकडे असलेल्या वक्तृत्व आणि लेखन कौशल्याचा फायदा जर कंपनीला त्यांच्यासाठी राबणाऱ्या हातांचा उत्साह वाढवण्यासाठी होणार असेल तर भविष्यात माझ्यासाठी हा मैलाचा दगड ठरेल हे नक्की.


संधी कोणतीही असू द्या मी ताकदीने उभा असतोचकंपनीने टाकलेल्या जबाबदारीचे सोने करण्याचा प्रयत्न असेलतुर्तास तरी अभ्यास जोरात सुरू आहेआरंभ है प्रचंड


विशाल गरड

३० ऑगस्ट २०२३पांगरी




1 comment:

  1. सोनेरी प्रवास....

    ReplyDelete

गुलीगत सुरजचा विजय असो !

निर्विवाद, निखळ आणि निरागस विजय !  ना मी बिग बॉस पाहिला, ना मी कुणाला मतदान केलय. त्याचे कारण असे की मी मुळात टीव्हीच फार कमी पाहतो. महत्वाच...