आज प्रथमच JAPFA India या नामांकित मल्टिनॅशनल कंपनीच्या कर्मचाऱ्यांना`टिम व्हिक्ट्री’ या विषयावर ऑनलाइन व्याख्यानातून प्रेरित केले. कधीतरी ही संधी येईल याची खात्री होतीच, ती आली आणि मी त्याचे सोने केले. व्याख्यान झाल्यावर कंपनीचे कंट्री हेड प्रसाद वाघ सर, वरिष्ठ अधिकारी महेश शिवणकर, समीर भिवापुरकर, बालाजी पाटील यांनी दिलेल्या हृदयस्पर्शी प्रतिक्रियेने कार्यक्रम प्रभावी झाल्याची पोचपावती मिळाली.
कार्यक्रम ठरल्यापासूनच गेली तीन चार दिवस काय बोलायचे याची तयारी करत होतो. अवघ्या तीस चाळीस मिनिटांच्या वेळेत विषयाला न्याय देण्याची जबाबदारी होती. डोक्यात अनेक संकल्पना आणि उदाहरणे होती पण कंपनीच्या कर्मचाऱ्यांना ज्यातून आत्मविश्वास देता येईल अशा शिवचरित्रातील काही निवडक गोष्टींना त्यांच्या कामाशी जोडून पंचेचाळीस मिनिटे बोललो.
होय, आजच्या कार्यक्रमातून मिळालेल्या अनुभवातून सांगू शकतो की आता इथून पुढे जर एखाद्या कंपनीला त्यांच्या कर्मचाऱ्यांचे कंपनीविषयीचे प्रेम वृद्धिंगत करायचे असेल, ते करीत असलेल्या कामाबद्दल त्यांना प्रोत्साहित करायचे असेल तर त्यांच्यासाठी विशाल गरड एक चांगला पर्याय असेल. कंपनीसाठी हजारो लाखो हात मेंदूच्या परवानगीने पोटापाण्यासाठी झटत असतात. त्यांच्या मेंदूत योग्य वेळी, योग्य समुपदेशन जर योग्य मार्गाने गेलं तर कंपनीची प्रोडक्टिव्हिटी वाढण्यास नक्किच मदत होते.
एक वक्ता जेव्हा लेखकही असतो तेव्हा त्याच्या डोक्यातले विचार तो प्रभावीपणे लिहू शकतो म्हणूनच हे आवर्जून सांगावेसे वाटतेय की`जेव्हा आपल्याला आपल्या व्यक्तिमत्त्वातला एखादा नवीन पैलू सापडतो तेव्हा आधी त्याला संधीच्या कानशीवर घासून पाहा आणि जर चमकलं तरच मग जगाला ओरडून सांगा है तैयार हम. आणि मी तेच करतोय.
विशाल गरड
१ सप्टेंबर २०२३, JAPFA INDIA.
अप्रतिम 🫰🫰
ReplyDelete