Sunday, September 3, 2023

सोनवणे सरांचे अभिष्ठचिंतन

लातूर मधील दिड हजार क्षमतेचा क्लास बंद करुनगोरगरिबांची लेकरं डॉक्टर इंजिनिअर व्हावीत म्हणून उक्कडगावच्या डोंगरात येवून कॉलेज उभा करणं.

सोप्पं नसतंय सोनवणे सर होणं


वयाची एकसष्टी पार करून सुद्धा वेळ प्रसंगी तितक्याच ताकदिनं वर्गात जाऊन फिजिक्स शिकवणं.

सोप्पं नसतंय सोनवणे सर होणं


किराणा दुकानदाराचं पोरगं एम्सला लावणं आणि शेतकऱ्याचं पोरगं सीओईपीला लावणं.

सोप्पं नसतंय सोनवणे सर होणं


संस्थाध्यक्षाची भूमिका सांभाळत संभाळतचप्राध्यापक आणि विद्यार्थ्यांना वडिलांसमान माया लावणं.

सोप्पं नसतंय सोनवणे सर होणं


एकाच दिवशी पहाटे लातूरच्या कॉलेजवरसकाळी धाराशिवच्या कॉलेजवरदुपारी उक्कडगावच्या कॉलेजवर आणि रात्री पुण्याच्या कॉलेजवर जाऊन भेट देणं.

सोप्पं नसतंय सोनवणे सर होणं


प्रत्येक विद्यार्थ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देणंत्यांच्या सुख दुःखात सहभागी होणंवेळ पडलीच तर काहींचे पालकत्व सुद्धा स्विकारणं

सोप्पं नसतंय सोनवणे सर होणं


स्वतःच्या आयुष्यातली अनंत दुःख विसरूनदुसऱ्यांच्या सुखासाठी झिझत राहणं

सोप्पं नसतंय सोनवणे सर होणं


खाजगी संस्था उभारूनकर्मचाऱ्यांना मात्र शासकीय नोकरीसारखी शाश्वती देणं

सोप्पं नसतंय सोनवणे सर होणं


वैयक्तिक आयुष्यात कितीही नुकसान होवू देत पण तरीही कर्मचाऱ्यांचा पगार मात्र वेळच्या वेळी करणं.

सोप्पं नसतंय सोनवणे सर होणं


तथाकथित संस्थाचालकाच्या टिपिकल मानसिकतेला तिलांजली देवून हजारो विद्यार्थी आणि शेकडो शिक्षकांच्या संकल्प परिवाराचा बाप बनून जगणं.

सोप्पं नसतंय हो, सोनवणे सर होणं


प्रिय सोनवणे सर,

आपणास वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा


विशाल गरड

 सप्टेंबर २०२३पांगरी 




No comments:

Post a Comment

गुलीगत सुरजचा विजय असो !

निर्विवाद, निखळ आणि निरागस विजय !  ना मी बिग बॉस पाहिला, ना मी कुणाला मतदान केलय. त्याचे कारण असे की मी मुळात टीव्हीच फार कमी पाहतो. महत्वाच...