Friday, September 1, 2023

निषेध

काय चूक असेल बरं तिची,

घरात असेल शिकून बेरोजगारीच्या ढिगाऱ्याखाली दडलेलं पोरगं,

असेल घरात सततच्या नापिकीमुळे आणि कवडीमोल भावामुळे नाऊमेद झालेला शेतकरी नवरा,

असेल घरात एक पोरगी लग्नाला आलेली.

वाटलं असेल तिलाहीझालो सहभागी आंदोलनात तर मिळेल मराठ्यांना आरक्षणमिळेल नोकरी पोरालायेतील चार दिवस सुखाचे

पण,

बदल्यात सरकारी काठीचे बक्षीस मिळाले आणि सर्वांगावरून रक्ताचे थेंब जणू फुलांसारखे ओघळलेतरिबी ती ताकदीने उभी राहून पुन्हा तुमच्या छाताडावर उभी राहून तिच्या लेकरांचा हक्क मागेलंच.


विशाल गरड

 सप्टेंबर २०२३पांगरी








No comments:

Post a Comment

गुलीगत सुरजचा विजय असो !

निर्विवाद, निखळ आणि निरागस विजय !  ना मी बिग बॉस पाहिला, ना मी कुणाला मतदान केलय. त्याचे कारण असे की मी मुळात टीव्हीच फार कमी पाहतो. महत्वाच...