तू माझ्या लेखणीतली शाई आहेस,
तू रंग पेटीतला रंग आहेस,
तू वक्तृत्वातला उच्चार आहेस,
तू कवितेतले शब्द आहेस,
तू गाण्यातला स्वर आहेस
तू कॅमेऱ्याची बॅटरी आहेस,
तू लेकरांची माय आहेस,
तू पोटातला घास आहेस,
तू जगण्याचा श्वास आहेस,
तू जेवणातले मिठ आहेस, भाजीतले तिखट आहेस, पोळीतला गुळ आहेस आणि संसारातला जीव आहेस.
या असंख्य कला देहात सांभाळणाऱ्या एका विशाल वादळाला सांभाळणारी तू बायकोच्या रूपातली जणू आईच आहेस. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बायको !
विशाल गरड
१८ सप्टेंबर २०२३, पांगरी
No comments:
Post a Comment