Sunday, October 1, 2023

गॉड ऑफ ब्रेन डॉ.अमित पडवळ

माझे प्रिय मित्रप्रसिद्ध न्यूरोलॉजिस्ट डॉ.अमित पडवळ यांनी काही दिवसांपूर्वी त्यांच्या हॉस्पिटलच्या नूतन इमारतीस सदिच्छा भेट देण्याची ईच्छा व्यक्त केली होतीत्यामुळे आज सायंकाळी वेळ काढून मित्राने उभारलेल्या मानवतेच्या मंदिरास भेट दिलीखरंच भगवंत हॉस्पिटलचे हे नवे रुप पाहून आनंदकौतुक आणि अभिमान वाटलादवाखान्यात जायला आणि राहायला कोणाला आवडेल ? पण पडवळ डॉक्टरांनी उभारलेली भगवंत सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलची नूतन इमारत पाहिली की निरोगी माणसाला सुद्धा तिथे मुक्काम करावासा वाटेल इतकी ती प्रशस्तस्वच्छदेखणीभव्य आणि शस्त्रास्त्रशास्त्रपारंगत झाली आहे.


आज आमची बार्शी बऱ्याच गोष्टींसाठी ओळखली जाते भविष्यात हीच बार्शी डॉ.पडवळ यांचे भगवंत सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल असलेली बार्शी म्हणून ओळखली जाईल यात शंका वाटत नाहीइतक्या अत्याधुनिक सुविधा बार्शी सारख्या शहरात उभारून डॉअमित पडवळ यांनी कर्मभूमीचे जणू ऋण फेडले आहेदेव प्रत्येक घरात जाऊ शकत नाही म्हणून तो आईच्या रुपात घराघरात आला आणि जन्माला आलेली लेकरे वाचवण्यासाठी तो डॉक्टरच्या रुपात आलाकाही अपवाद वगळता सगळेच डॉक्टर देवाचे रुप असतातमरणाच्या दारात उभा असलेला किंवा मरणाला स्पर्श करून परत आलेला प्रत्येक रुग्ण त्या डॉक्टरलाच देव मानतो.


मित्र आहे म्हणून अतिशयोक्ती करणार नाही पण डॉ.अमित पडवळ यांना त्यांच्या डिग्रीमुळे परदेशात अतिप्रचंड मोठ्या संधी असतानासुद्धा या माणसाने मुंबई पुण्याच्या तुलनेत अगदीच लहान असलेल्या बार्शी शहरात राहून मेंदूच्या आजारांवर उपचार आणि शस्त्रक्रिया करण्याचं ठरवलं आणि आता त्यांच्या स्वप्नातले सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सुद्धा याच शहरात उभारण्याचा निर्णय घेवून तो पूर्णत्वास नेलाय ही गोष्टी त्यांना पद्मश्री देण्यासारखी आहेहजारो डॉक्टरात एक न्यूरो सर्जन असतो आणि लाखो डॉक्टरात एक हुशार न्यूरोसर्जन असतोडॉ.अमित पडवळ हा आमच्या बार्शीचा लाखात एक असलेला डॉक्टर आहे


माझी बार्शी अनेक गोष्टींमुळे प्रगतीच्या उंचावर जात आहेपण वैद्यकीय क्षेत्रात देखील माझे खास दोस्त डॉ.अमित पडवळडॉ.राहुल मांजरेडॉ.मनोज जाधवडॉ.मिलिंद चौधरीडॉ.किरण मांजरे हे नव्या पिढीचे डॉक्टर बार्शीच्या वैद्यकीय सुविधेला उंची प्राप्त करुन देत आहेत याचे समाधान वाटतेअमित डॉक्टरसारखा एक माणसातला देव रुग्णांना आशिर्वाद देण्यासाठी भगवंत हॉस्पिटलच्या नव्या इमारतीच्या गाभाऱ्यात येत्या दसऱ्यापासून बसणार आहेत्यांच्या या सुपर इनिंगला माझ्या प्रेमपूर्वक शुभेच्छा


विशाल गरड

 ऑक्टोबर २०२३बार्शी




No comments:

Post a Comment

गुलीगत सुरजचा विजय असो !

निर्विवाद, निखळ आणि निरागस विजय !  ना मी बिग बॉस पाहिला, ना मी कुणाला मतदान केलय. त्याचे कारण असे की मी मुळात टीव्हीच फार कमी पाहतो. महत्वाच...