Monday, October 23, 2023

सामान्यांचा असामान्य नेता

राजेंद्र विठ्ठल राऊतएका सामान्य कार्यकर्त्यापासून आमदार झालेला माणूसया माणसाने राजकारणात प्रवेश करण्यापूर्वी कधी ठरवले नव्हते की मला आमदार व्हायचंयसन १९९५ च्या कालखंडात राजाभाऊंनी मराठा महासंघाचा कार्यकर्ता म्हणून प्रवास सुरु केला त्यावेळी तत्कालीन आमदारांच्या प्रचार यंत्रणेत राजाभाऊ असायचेशेती करणारा राजा राऊत नावाचा हा युवक सन १९९७ साली बार्शी नगरपालिकेचा नगराध्यक्ष होवून राजाभाऊ राऊत झालाइथून पुढे या नेत्याने कधी मागे वळून पाहिलेच नाही१९९९ साली झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत पहिल्याच प्रयत्नात राजाभाऊंनी तगडी लढत दिलीत्यावेळी त्यांचा अवघ्या ३२७ मतांनी पराभव झालापांढरी सुमो गाडीगालावर दाढीपांढरी शर्ट पॅंटपायात बाटा चप्पलकपाळी आडवी भगवी रेषगळ्यात काळा दोरा अशा पेहरावातल्या या युवा नेत्याने सगळा तालुका पिंजून काढलाग्रामीण भागातील गावातल्या घरांचा उंबरा ना उंबरा शिवलासुरुवातीला त्यांच्या दिमतीला राऊत चाळीतली फौज होतीच पण लोकांच्या स्थानिक प्रश्नांना वाचा फोडल्याने राजाभाऊ ग्रामीण बार्शीच्या ह्रदयातील ताईत झालेयाच जोरावर २००४ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत राजाभाऊ पहिल्यांदा आमदार झालेपुढे सलगदोन वेळा त्यांचा पराभव झाला तरी जनतेने त्यांना कधी तुम्ही आमदार नाहीत असे जाणवू दिले नाहीराऊत चाळीतल्या त्यांच्या संपर्क कार्यालयाची गर्दी उलट वरचे वर वाढतच गेलीत्यांनीही आमदारकी नसताना सुद्धा पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जनतेची अविरत सेवा केली


वेळोवेळी बदलणाऱ्या राजकीय परिस्थितीमुळे राजाभाऊंनी पक्षांतरे केली त्याचा त्यांना कधी फटकाही बसला आणि कधी फायदाही झालापण २०१९ सालच्या विधानसभा निवडणुकीत मात्र त्यांनी अपक्ष निवडून येवून अख्ख्या महाराष्ट्राला त्यांच्या वैयक्तिक ताकदीची धमक दाखवून दिलीआज घडीला बार्शी तालुक्यातील बहुतांश ग्रामपंचायतीपंचायत समिती , जिल्हा परिषद सदस्यनगरपालिकामार्केट कमिटी आणि विविध कार्यकारी सोसायट्यांवर राऊत गटाने वर्चस्व प्रस्थापित केलंयफक्त चहा पाण्यावर निवडणुका पार पडण्याचा काळ आता नामशेष झालाहल्लीच्या निवडणुका या प्रचंड खर्चिक असतातराजकारण म्हणलं की फक्त धनदांडग्यांचे काम असा पायंडा पडत असताना राजाभाऊंनी मात्र जनतेची सेवा करण्याची धमक असणाऱ्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांना पंचायत समितीसदस्यजिल्हा परिषद सदस्यबाजार समिती सदस्यनगरसेवकउपसभापतीसभापतीनगराध्यक्ष केले


राजभाऊंचे एकत्र कुटुंब हे त्यांच्या राजकीय वाटचालीतील एक बलस्थान राहिले आहेजवळपास १४० गावांचा असलेल्या बार्शी तालुक्यात प्रचार यंत्रणा राबवणे खायची गोष्ट नाही अशात जर रक्ताची माणसे दिमतीला असली की भार आपसूक हलका होवून जातअसतोभाऊ एवढ्या बाबतीत नशीबवान ठरले कारण त्यांना त्यांचा राजकीय आणि व्यावसायिक भार लवकर खांद्यावर उचलणारे पुत्ररणवीर राऊत आणि रणजित राऊतपुतण्या अभिजीत राऊतआणि भाऊ विजयनाना राऊत  संजय राऊत मिळालेएखाद्या नेत्यासाठी जेव्हा त्याच्या घरातील माणसं जीव तोडून झटत असतात तेव्हा कार्यकर्तेही मग जिवाचे रान करायला लागतातम्हणूनच याआधीच्या सर्व निवडणुकीत त्यांनी सिंहाचा वाटा उचलला आता यापुढे होणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत भाऊंना प्रचार यंत्रणेची काळजी असणार नाही उसके लिये तो अब अकेला रणवीर ही काफी है


बार्शी नगरपालिकेच्या नगरसेवक पदापासून सुरु झालेला राजाभाऊंचा प्रवास लोकांच्या आग्रहास्तव आमदारकीपर्यंत येवून ठेपलाराजकारणात लागणारी सगळी आयुधं या माणसाने लिलया मिळवलीहे करत असताना आपण ज्या संघर्षातून आलोय तो संघर्ष राजाभाऊ कधीच विसरले नाहीतपदे येतात जातात पण ज्या कार्यकर्त्यांनी आपल्याला तळहाताच्या फोडासारखं संभाळलेलं असतं त्यांना सत्ता असो वा नसो आपण सांभाळलं पाहिजे आणि कार्यकर्त्यांना सांभाळण्यासाठी आधी स्वतः ताकदवान बनलं पाहिजे म्हणूनच राजकारणात प्रवेश करताच त्यांनी उद्योगधंद्यातही प्रवेश केलालक्ष्मी दूध संघभाग्यलक्ष्मी पतसंस्थासोनू रिच मिनरल वॉटरखडीक्रशरलक्ष्मी सोपान कृषी उत्पन्न बाजार समितीदाल मिलआडत व्यापारया त्यांच्या उद्योगातल्या पाऊलखुणा आहेत ज्या माध्यमातून त्यांनी वैयक्तिकरित्या हजारो हातांना रोजगार उपलब्ध करुन दिलासुरुवातीच्या कालखंडात आक्रमक भाषणे करणारे राजाभाऊ आमदार झाल्यावर मात्र आता गावखेड्यातील युवकांना उद्योगाकडे वळण्याचे मार्गदर्शन करताना दिसतातमतदार संघातील युवकांनी मिळेल ते काम करुनलाज  बाळगता उद्योग व्यवसाय करुन यश मिळवले पाहिजे असा त्यांचा अट्टाहास असतो.  


आजच्या काळात नुसतं आमदार होवून संघर्ष संपत नाही तर शासन दरबारी आपले वजन निर्माण करायला सुद्धा कौशल्य विकसित करावं लागतं जे आमदार राजाभाऊंनी सध्याच्या मंत्रिमंडळात केलंयमहाराष्ट्रातला एक मास लिडर आमदार म्हणून ओळख असलेल्या भाऊंनी अवघ्या वर्ष भराच्या कालखंडात बार्शी शहर आणि तालुक्यासाठी १८०० कोटीहून अधिक निधी मंजूर करून आणलाययापैकी बार्शी नगरपरिषदेसाठी जवळपास ३०० कोटीतालुक्यातील साठवण तलावांसाठी ५० कोटीकोर्टाच्या इमारतीसाठी ९० कोटीग्रामीण रुग्णालयासाठी २० कोटीबार्शी उपसा सिंचन योजनेसाठी ३०० कोटीयांसह शहर  तालुक्यातील ग्रामीण रस्तेपूल  विविध शासकीय योजनांसाठी जवळपास १००० कोटी रुपयांचा निधी त्यांनी खेचून आणलाय.  


बार्शी तालुक्यात अशी कित्येक गरीब कुटुंब सापडतील की भाऊंच्या आर्थिक मदतीमुळे त्यांच्या मुलीचे लग्न झालेकुणाचे आई वडीललेकरू दवाखान्यात नीट झालेत्यांच्या मध्यस्तीमुळे भावा भावाची भांडणे संपलीभावकीचे वाद मिटलेराजकीय वैर संपलेमुलगीनांदायला आलीकोर्टाचे वाद निकाली निघालेविद्यार्थ्यांचे कॉलेजात प्रवेश झालेपोलिसांनी पकडलेली गाडी सोडल्याचे तर हजारोसापडतीलअर्थात ही कामे आमदाराच्या कार्यकक्षेत येत नाहीत पण राजाभाऊ राऊत या व्यक्तीने स्वतःभोवती तशी कक्षाच टाकून न ठेवल्यामुळे आजही ते स्वतःच स्वतःचा पी. म्हणून काम करतातम्हणूनच तालुक्यात `हॅलोराजाभाऊ बोलतोय’ या एका वाक्यावर कामे निकालात निघतातप्रवासाने शरीर थकतंबोलून बोलून घसा दुखतोजागरणाने डोळे जळजळतात पण लोकसेवेचा वसा घेतलेला हा राजा प्रजेसाठी भोसले चौकात अहोरात्र उपलब्ध असतोच


हा लेख मी केवळ एक लेखक आहे म्हणून एका आमदारावर लिहिलेला नसून लहानपणापासून ज्यांची कारकीर्द मी माझे वडील विजय गरड सरांमुळे जवळून अनुभवू शकलो त्या कारकिर्दीचा सन्मान म्हणून लिहिलायमाझ्या वडिलांना ज्या माणसाने राजकारणात कुटुंबातला माणूस मानलंएका निष्ठावान कार्यकर्त्याला भूतकाळात दिलेल्या शब्दाला जागण्यासाठी पंचायत समितीला उभं करून जणू स्वतःचा भाऊच उभा आहे असे समजून प्रचार यंत्रणा राबवलीदुर्दैवाने ते पराभूत झाले तरी शेवटी जिल्हा नियोजन समितीवर विशेष निमंत्रित सदस्य पदी नियुक्ती करुन त्यांच्या २५ वर्षाच्या निष्ठेचा सन्मान केलाहे तर फक्त एक उदाहरण झाले पण तालुक्यातील शेकडो गरीब कार्यकर्त्यांचे पदाधिकारी होण्याचे स्वप्न राजाभाऊंनी स्वखर्चाने पूर्ण केलंय हे या नेत्याचे असामान्य मोठेपण आहेखुर्च्या येतात जातातपदे मिळतात संपतात पण राजकारणात जो दिलेला शब्द पाळतो तो नेता म्हणून आजन्म सत्ता गाजवत राहतो आणि जे शब्द फिरवतात त्यांची कारकीर्द संपते.


राजाभाऊंनी तालुक्याला कधी सांगितलेही नव्हते की मी इतका निधी आणेल पण त्यांनी जे सांगितले त्याहीपेक्षा तिप्पट चौपट निधी अवघ्या वर्षभरात आणून बार्शीच्या इतिहासातला एकमेव आमदार म्हणून अढळ स्थान निर्माण केलेभारताचे पंतप्रधान मा.नानरेंद्र मोदी यांच्या प्रेरणेतून आणि राज्याचे उपमुख्यमंत्री मा.ना.देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार राजेंद्र राऊत बार्शी तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी करीत असलेली भव्य विकासकामे पुढील मंत्रिमंडळात मंत्री म्हणून समाविष्ठ होवून आणखीन अतिभव्य होवोत हेच आजच्या वाढदिवसानिमित्त त्यांचे अभिष्ठचिंतनप्रिय भाऊ खूप खूप शुभेच्छा !


लेखक : प्रा.विशाल गरड, पांगरी

(सदर लेख दिनांक २३ ऑक्टोबर २०२३ रोजी दैनिक लोकमत मधे प्रसिद्ध झाला आहे) 






No comments:

Post a Comment

गुलीगत सुरजचा विजय असो !

निर्विवाद, निखळ आणि निरागस विजय !  ना मी बिग बॉस पाहिला, ना मी कुणाला मतदान केलय. त्याचे कारण असे की मी मुळात टीव्हीच फार कमी पाहतो. महत्वाच...