आज दसऱ्याच्या शुभदिनी विचारांचे सोने स्विकारण्यासाठी आमच्या पांगरीचे जेष्ठ पत्रकार तात्या बोधेंची भेट घेतली. आमच्या गावातल्या या ऐंशी वर्षाच्या समृद्ध विद्यापीठात मला नेहमीच नवनवीन शिकायला मिळते. आज तात्यांच्या घरी गेल्यागेल्याच `विशाल लोकमतमधला तू राजाभाऊंवरचा लिहिलेला लेख मला फार आवडला’ अशी प्रतिक्रिया दिली. तात्या आजही वृत्तपत्रातील प्रासंगिक लेख आवर्जून वाचतात व त्याबद्दल कधी भेटून तर कधी फोनवरून प्रतिक्रिया देतात. इतरवेळीही लिहिलेल्या लिखाणावर सुद्धा ते भरभरून बोलतात. त्यांना पत्रलेखनाचा छंद असल्याने अनेक पत्र त्यांनी संग्रही ठेवली आहेत.
त्यांच्या नातीने पाठवलेले पत्र आज त्यांनी माझ्याकडून वाचून घेतले. ते ऐकताना त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद टिपण्यासारखा होता. जगकितीही टेक्नोलॉजीने पुढे जाऊद्या जोपर्यंत तात्यांसारख्या जेष्ठ मित्रांचा हात माझ्या खांद्यावर आहे तोपर्यंत माझे लिखाण नवनवीन आयाम गाठत राहील. मी पुस्तकं ढिगभर वाचली पण त्यासोबत हजारो पुस्तकांचा अर्क ज्यांच्या व्यक्तिमत्त्वात मुरलेला असतो अशी तात्यांसारखी माणसं वाचली म्हणूनच माझ्या विचारांना समृद्धी लाभली. तात्या दीर्घायुषी व्हा, तुम्हाला जेव्हा केव्हा भेटतो तेव्हा मला बापूंची आठवण होते. तुमच्या मार्गदर्शनाचा मी सदैव भुकेला.
विशाल गरड
२४ ऑक्टोबर २०२३, पांगरी
No comments:
Post a Comment