Wednesday, August 2, 2023

अरे माणसा



`दिसतेय काय ? आभाळातून वाहणारी नदीहे करोडो लिटर पाणी कसल्याही आधाराविना हवेत तरंगतयअरे माणसाजो आधार आभाळाने ढगाला दिलाय तोच मातीने तुला दिलायतू कितीही प्रगती कर फक्त मातीच्या मुळावर उठू नकोसअन्यथा जेव्हा केव्हा आभाळाला दिसेल की तू मातीला त्रास देत आहेस तेव्हा ते फाटेल आणि तुझं सगळं काही वाहून नेईलमग उगाच देवा दिकाच्या नावाने बोंबलत बसू नकोसज्या नदीला देवी मानतोसतिचे पाणी तीर्थ म्हणून पितोस त्याच नद्यांना गटार केलीस तूजिच्यात घाण टाकतोस तिच्यातच तुझं पाप धुण्यासाठी डुबकी मारतोसआजवर कित्येक वैयक्तिक पापे धुतली आहेत तिने पण आता सामूहिक पापांची शिक्षा भोगायला तयार राहा.’


काल कॉलेजवरून येताना सहजच हा फोटो क्लिक केला होतापहाटे तोच फोटो डोळ्यासमोर आला आणि त्यावरून  वरील संदेश स्फुरलासकाळी उठल्या उठल्या मी तो लिहून ठेवलाहे असलं मलाच का बरं सुचलं असावं याचा विचार करता करता कदाचित त्या निसर्गाला माझ्या करवी मानवाला काही संदेश द्यायचा असेल म्हणूनच हे मला सुचलं असावं असं वाटलं म्हणूनच हे पोस्ट केलं


बाकी ही काही मनोरंजनात्मक पोस्ट नाहीकित्येकजण तर फक्त फोटो पाहून स्क्रॉल करतील पण जे थांबतीलवाचतील ते निदान यावर क्षणभर विचार करतील आणि तेच साध्य असेलतसेही या कलियुगात चांगलं ते दबलं जातं आणि वाईट ते वेगाने पसरत राहतंया संदेशाचंही कदाचित तसंच होईलपण काही लोकांपर्यंत जरी हा विचार पोहचू शकला तरी सूचनं सार्थकी लागेल म्हणून हा अट्टाहास


विशाल गरड

 ऑगस्ट २०२३पांगरी



No comments:

Post a Comment

गुलीगत सुरजचा विजय असो !

निर्विवाद, निखळ आणि निरागस विजय !  ना मी बिग बॉस पाहिला, ना मी कुणाला मतदान केलय. त्याचे कारण असे की मी मुळात टीव्हीच फार कमी पाहतो. महत्वाच...