Thursday, October 22, 2020
पेंटिंग भेट
Thursday, October 15, 2020
वरुणराजा, माती तरी शिल्लक ठेव !
आजवर तू शेतात साचलास, नदीतून वाहिलास, तुझ्या या वागण्याने पिकांचे नुकसान व्हायचे, कधी घुसलास शहरात तर दुकाने आणि घरांचे नुकसान व्हायचे हे कमी की काय म्हणून आज मात्र तू शेतातून वाहिलास आणि ज्या उदरातून एका दाण्याचे आम्ही शंभर दाणे करायचो ते उदरच वाहून नेलेस की रे. गेलेलं पीक पुन्हा आणता येईल, पडलेले घर पुन्हा बांधता येईल पण वाहून गेलेली आमची काळी माती आता कुठं शोधायची रे. तू ज्या रस्त्यांवरून बेदरकारपणे वाहिलास ते रस्ते उद्या पुन्हा कोरडे होतील, तुझ्या चिखलाच्या पाऊलखुणाही काही दिवसात फुफुटा होऊन उडून जातील पण शेतकरी राजाच्या शेतातली तू वाहून नेलेली काळी माती कशी परत देशील ?
तू निसर्गाचे एक अपत्य आहेस तरीही तुला सांगतो मातीचा एक इंच थर तयार व्हायला पाचशे वर्ष लागतात आणि तू मात्र तो थर काही क्षणात वाहून नेतोस. अरे आजपर्यंत आमची पीके अशी कितींदा तरी वाया गेलीत पण जर तू पिकांसोबत आमची माती सुद्धा वाहून नेणार असशील तर शेती करायची कशी ? सततचा कोरडा दुष्काळ, अतिवृष्टी, निकृष्ठ बियाणे, किडी आणि रोगांचा प्रादुर्भाव, खते औषधांच्या वाढत्या किंमती, बँकांची कर्ज, पडलेले बाजारभाव, आयात निर्यात धोरण, मजुरांचा तुटवडा ही संकटे पाचवीला पुजलेली असताना ज्या मातीने आम्हाला सदैव साथ दिली ती सुद्धा तू वाहून नेलीस.
"चार महिने काबाड कष्ट करून काढलेल्या सोयाबीनची शेज उद्या मळायची आहे, पाच पन्नास पोती तरी होतीलच. पैसे आले की देणी पाणी फेडायची, लॉकडाऊनमुळे झालेल्या दैनेवर याचीच आशा आहे. यंदा दिवाळी चांगली करायची लेकरांसाठी" हे सगळं रात्री स्वप्नात पाहत होता शेतकरी आणि दुसऱ्या दिवशी रानात जाताना खळ्यावर रिचवलेल्या सोयाबीनची ढिगारा ताडपत्रीसह नदीच्या पाण्यावर वाहून जाताना पाहून त्या शेतकऱ्यांची स्वप्न सुद्धा वाहून गेली. फक्त गळ्याला फास लावणे म्हणजेच मरण नसतं; हे असे दृश्य पाहताना पाहिलेली स्वप्न डोळ्यातील अश्रूंसोबत वाहू देणं मरणापेक्षा भयंकर असतं.
वक्ता तथा लेखक : विशाल गरड
दिनांक : १४ ऑक्टोबर २०२०
Friday, September 18, 2020
संसार एक सिनेमा
Thursday, September 17, 2020
प्रतापगड संवर्धन मोहीम
दुर्ग रक्षणाचे अविरत श्रम जणू यांच्या पाचवीलाच पुजले आहे म्हणूनच की काय यांना श्रमिक हे नाव शोभून दिसते. माझे प्रिय मित्र श्रमिक गोजमगुंडे यांचा दुर्ग अभ्यास म्हणजे आजच्या पिढीला मिळालेला एक ऐतिहासिक ठेवा आहे. तंजावर पासून अटक पर्यंत असलेल्या शिवरायांच्या शेकडो किल्ल्यांची पदभ्रमंती केलेला हा माणूस जणू शिवाजी राजांनी आज्ञा देऊन पृथ्वीवर धाडला असावा असेच वाटते. श्रमिक सरांनी स्थापन केलेल्या सह्याद्री प्रतिष्ठाणचे काम फक्त उल्लेखनीय नसून ते अभिमानास्पद आहे. या स्वराज्यातील प्रत्येक मावळ्याला त्यांच्या कार्याचा अभिमान आहे.
ज्या किल्ल्यांना शिवरायांचा सहवास लाभला, ज्या बुरुजावर शिवराय उभे ठाकले ते बुरुज ढासळल्यावर, तटबंदी तुटल्यावर त्या पुन्हा उभ्या करण्याची जबाबदारी कुणाची ? याचे उत्तरे अनेक आहेत पण सध्या तरी याचे उत्तर सह्याद्री प्रतिष्ठाण महाराष्ट्र हेच आहे. कारण त्यांनी आजवर केलेली दुर्गसेवा आणि किल्यांना लावलेली स्वराज्याची प्रवेशद्वारे पाहता हे काम ते लोकवर्गणीतून अतिशय प्रामाणिकपणे करू शकतील याची खात्री आहे. परवानगीच्या बाबतीत अत्यंत क्लिष्ट अशा पुरातत्व खात्याला सुद्धा सह्याद्री प्रतिष्ठाणवर विश्वास असल्याने त्यांनी गडावरील बांधकामास व प्रवेशद्वार बसवण्यास परवानगी दिली आहे.
पाण्यासंबंधी जे काम महाराष्ट्रात पाणी फाऊंडेशनने केले तसेच दुर्गरक्षणाचे काम आज महाराष्ट्रात सह्याद्री प्रतिष्ठान करत आहे. या दुर्गरक्षणाचे रूपांतर लोकचळवळीत करण्यात श्रमिक गोजमगुंडेसह प्रतिष्ठाणच्या सर्व कार्यकर्त्यांनी प्रचंड कष्ट घेतले आहे. जेव्हा भविष्यात प्रतापगडाच्या तटबंदीचे बांधकाम पूर्ण होईल तेव्हा ते पाहताना हि तटबंदी बांधण्यात मी सुद्धा खारीचा वाटा उचललाय ही भावनाच प्रचंड समाधान देऊन जाईन.
एका माणसाने केलेल्या लाखो रुपयाच्या मदतीपेक्षा लाखो माणसांनी एकत्र येऊन गोळा केलेला एक एक रुपया केव्हाही मोठा असतो कारण त्या निधीत लाखो लोकांच्या भावना जोडल्या जातात. प्रतापगडावरच्या बुरुजाखालची ढासळलेली तटबंदी बांधण्यासाठी जो निधी लागणार आहे तो उभा करण्यासाठी सह्याद्री प्रतिष्ठाणने आवाहन केले आहे. मीही फुल न फुलाची पाकळी म्हणून ₹ १००१ एवढी समिधा अर्पण करूनच हा लेख लिहिला आहे. मदत छोटी का मोठी ते महत्वाचे नसते जेव्हा छोटी छोटी मदत खूप जण करतात तेव्हा आपोआप ती मोठी होते. तेव्हा सह्याद्री प्रतिष्ठानच्या या स्वराज्य कार्यात आपणही स्वेच्छेने योगदान द्यावे ही विनंती.
सह्याद्री दुर्गसेवक 👇🏾
निधी संकलन : गुगल पे / फोन पे उपलब्ध
श्री.हरिश्चंद्र गेनबा बागडे 9869341992
श्री.सुरज सतिश नाळे 9561096421
सह्याद्री प्रतिष्ठान महाराष्ट्र - घेतला वसा दुर्गसंवर्धन चळवळीचा
वक्ता तथा लेखक : विशाल गरड
दिनांक : १७ सप्टेंबर २०२०
Monday, September 7, 2020
द फ्रेम
Saturday, September 5, 2020
बेड शिल्लक नाही
Thursday, September 3, 2020
हॅप्पीबर्थडे सोनवणे सर
गोष्ट एका शस्त्रक्रियेची.
दिनांक १२ सप्टेंबरला मला आणि बार्शीचे प्रसिद्ध सर्जन डॉ.राहुल मांजरे यांना बार्शीत पुरस्कार होता त्यासाठी म्हणून मी पांगरीहून आधी डॉक्टरच्या...
-
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खवड्या डोंगरावरून एका १८ वर्षाच्या मुलाने (वाचलेल्या बातमी नुसार) आय फोनचे हाफ्ते तटले म्हणून उडी मारून जीव ...
-
सोनवणे सर या जगात नाहीत यावर अजूनही विश्वास बसत नाही. अभाळाएवढा माणूस पण असा एका क्षणात संपावा हे माझ्या मनाला न पटणारं आणि न सुटणारं कोडं...
-
दूधाच्या भावात अवघ्या महिनाभरातच लिटरमागे दहा बारा रुपयांची वाढ आजवर सरकारला शक्य झाली नाही पण ते तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईमुळे शक्य ...