Wednesday, April 5, 2023

लेक माझी `कादंबरी’

जोपर्यंत आपल्या पोटी मुलगी जन्म घेत नाही तोपर्यंत मुली बद्दलच्या आपल्या संकल्पना वेगळ्या असतात. जेव्हा ती आपलं लेकरूम्हणून घरात येते आणि तारुण्याला बापपण देते तेव्हा तिच्यासोबतचा प्रत्येक क्षण स्वर्गीय अनुभव देवून जातो. आज आमची कादंबरीउर्फ साऊ तीन वर्षाची झाली. कॉलेजवरून घरी गेलो की गाडीचा आवाज ऐकताच साऊ दारात येवून उभारते आणि मी घरात पाऊलठेवताच पळत येवून घट्ट मिठी मारते हा क्षण कधी संपुच नये असे वाटते. साऊ आता अस्सखलित बोलते त्यामुळे तिच्या का ? ला उत्तरेदेता देता माझी आणि विराची दमछाक होते.


लेकरं ही आई बापाचे अपडेटेड व्हर्जन असतात याची खात्री पटली आहे. बालहट्ट काय असतो याचीही अनुभूती आली आहे. गावाजवळनोकरी असल्याने आई बाबांसोबतच सध्या साऊ आज्जी, आजोबा, काका, मामा, मामी, आत्या, आत्याआज्जी यांच्या संस्कारात मोठीहोत असल्याचे समाधान आहे. माणसांनी भरलेलं घर असल्याने तिचा शब्दसंग्रह अतिप्रचंड झालाय. या माझ्या शरीररूपी कादंबरीवरलिहीत बसलो तर एक पुस्तकरूपी कादंबरी तयार होईल इतक्या साऱ्या आठवणी तिने मनाच्या पटलावर रुतवून ठेवल्यात.


कोणत्याही शर्यतीची सुरुवात एक, दोन, तीन म्हणून होते. माझ्या साऊचाही आता तिसरा वाढदिवस झाल्याने तिची शैक्षणिक स्पर्धासुरु झाली आहे. फक्त वर्गात पहिला नंबर म्हणजेच हुशार या संकल्पनेपासून तिला दूर ठेवायचा माझा प्रयत्न असेल. फक्त नोकरीआणि चांगलं स्थळ मिळावं या असल्या क्षुल्लक उद्देशाने मी तिला शिक्षण देणार नाही तर प्रचंड स्पर्धेच्या जगातही ती कर्तृत्वाने उठूनदिसेल असे शिक्षण देईल. प्रिय साऊ, तुला तिसऱ्या वाढदिवसाच्या बापाकडून हार्दिक शुभेच्छा ! लव्ह यू पिल्ला. 


विशाल गरड

०५ एप्रिल २०२३, पांगरी




Thursday, March 16, 2023

सीमोल्लंघन

सुमारे सहा सात वर्षापुर्वी कर्नाटक राज्यातील हुलसुर येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या अनावरणप्रसंगी, माजीमुख्यमंत्री बी.एस.येडीयुरप्पा यांच्या प्रमुख उपस्थितीत माझे भव्य व्याख्यान झाले होते. आसपासच्या दहा बारा गावाहून त्यावेळी लोकंआली होती. हजारो श्रोते समोर बसलेले असताना प्रत्येक श्रोता वक्त्याच्या लक्ष्यात राहणे अशक्यच पण वक्ता मात्र प्रत्येक श्रोत्याच्याडोक्यात दीर्घकाल जीवंत राहू शकतो हे खालील उदाहरणावरून सिध्द होते. 


मागील महिन्यात माझे व्याख्यानाचे दौरे सुरु असतानाच कर्नाटकातील तलवाड गावातून नवयुवक तरुण मंडळाच्या संतोष बिरादार यांचाफोन आला की त्यांच्या गावात उभारलेल्या छत्रपती शिवरायांच्या अश्वारूढ पुतळयाच्या उद्घाटनप्रसंगी आयोजित केलेल्याव्याख्यानाच्या कार्यक्रमासाठी त्यांना माझी तारीख हवी होती. मी म्हणले “तुम्ही कुठे ऐकले माझे व्याख्यान ?” तेव्हा ते म्हणाले की“तुमच्या हुलसूरच्या कार्यक्रमाला आम्ही आलो होतो. तेव्हाच ठरवले होते की आपल्या गावात स्मारक उभारले की तुम्हालाचबोलवायचे”. त्यांच्या या वाक्याने मी भाराहून गेलो. त्यांना नियोजित तारीख विचारुन मी लागलीच डायरीत टिपून ठेवली. 


खरं तर असे प्रसंग प्रत्येक वक्त्याच्या आयुष्यात येत असतात पण जेव्हा लोकं आपल्याला तासभर ऐकून तब्बल सहा सात वर्ष आठवणठेवून बोलवतात तेव्हा असे प्रसंग अभिमानाने टायपून शेअर केले जातात त्यांपैकीच हा एक. बाकी आत्मविश्वासाने सांगतो येत्या १९मार्चला कर्नाटकातील शिवभक्तांच्या आयुष्यभर स्मरणात राहिल असे व्याख्यान होईल. कर्नाटकवासियांनो तुमच्या कानावर माझ्याशब्दांचा अभिषेक करुन शिवप्रभूंना वंदन करण्यासाठी मी येतोय तुमच्या तलवाड मराठा नगरीत. अवघे अवघे या, शिवचरित्राचा जागरकरू या !


प्रा.विशाल गरड

१६ मार्च २०२३, पांगरी




Saturday, March 4, 2023

रौंदळ - गोड ऊसाची, कडू कहानी

रौंदळ मधे दाखवलेली शेतकऱ्याची गोष्ट फक्त हिंगणी गावातल्या ऊस उत्पादक शेतकऱ्याची नसुन ती इथल्या प्रत्येक शेतकऱ्याची आहे. आपला देश कृषिप्रधान आहे हे चित्रपटातूनही दिसायला हवे आणि रौंदळ मधे ते गडद करुन दाखवलं त्याबद्दल लेखक आणि दिग्दर्शकगजानन पडोळ यांचे आभार. सिनेमात ग्रामीण जीवनशैलीचा कॅनव्हास खूप छान पद्धतीने मांडला गेलाय त्यातच फायटींगसोबतचगावरान प्रेमकहाणी अधुन मधून अलगदपणे सुगंध दरवळत येत राहते. 


रौंदळ मधील बरीच पात्र दोस्तांनी रंगवली असल्याने पहिल्याच दिवशी हा चित्रपट पाहने बंधनकारक होते. शिवाचे मुख्य पात्रसाकारणारे भाऊ शिंदे, बिट्टूचे खलनायकी पात्र साकारणारे यशराज डिंबळे, सरपंचाचे पात्र साकारलेले विनायक पवार आणि निर्मातेप्रमोद चौधरी या माझ्या दोस्तांनी चित्रपटात प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. रौंदळ मधील सर्व गाणी जणू नववधूवर चढवलेल्यासोन्याच्या अलंकाराप्रमाणे उठून दिसतात. कथानक वास्तवाला घट्ट मिठी मारलेलं असल्याने शेती जगलेल्या आणि भोगलेल्याप्रत्येकाच्या ह्रदयाला ते स्पर्शून जाते. 


शिवाची भूमिका साकारलेल्या भाऊंनी अभिनय करताना चेहऱ्यावरचे हावभाव दाखवण्यात आखडता हात घेतल्याचे जाणवते याउलटबिट्टूचे पात्र साकारलेला यशराज आणि अभिनेत्रीचे पात्र साकारलेल्या नेहाने दिसण्यातून, वागण्यातून आणि बोलण्यातून अभिनयाचीमुक्त उधळण केली असल्याने रौंदळमधे हिरोपेक्षा व्हिलन आणि हिरोइनच जास्त भाव खावून जाते. 


असो, शेतकऱ्यांचे ज्वलंत प्रश्न मांडणारे खूप कमी चित्रपट मोठ्या पडद्यावर येत असतात. शेतकऱ्यांनी ते पाहायलाच हवेत. ‘त्यांनाभाकर द्यायची नसते, फक्त दाखवायची असते’  देशाला भाकरी पुरवणाऱ्या शेतकऱ्यांबद्दल कारखान्याच्या चेअरमनच्या तोंडुन निघालेलंहे वाक्य चित्रपटाच्या कथानकातला आत्मा आहे. अधिकचे लिहीत नाही. आपल्या मातीतला आणि माणसातला हा सिनेमा शेतकऱ्यांनीअवश्य बघावा. 


प्रा. विशाल गरड

३ मार्च २०२३






Thursday, January 19, 2023

अमेरिकेचा दोस्त

खूप वर्षांनी अमेरिकेहून भारतात आल्यावर कुणाच्यातरी बकेट लिस्ट मध्ये आपल्याला घरी येऊन भेटणे असावे हे केवढे अहो भाग्य म्हणावे; जे माझ्या पदरी पडले. अमेरिकेतील शार्लट मराठी मंडळाचे सदस्य आणि सध्या अमेरिकेचे नागरिक असलेले राहुल गरड यांनी माझ्या पांगरी येथील निवासस्थानी सदिच्छा भेट दिली सोबत त्यांनी माझ्यासाठी एक स्वेटर, विरासाठी काही परफ्यूम आणि साऊसाठी चॉकलेट्स भेट म्हणून आणले.


आमचं आडनाव जरी सेम असलं तरी अवघ्या दोन तीन वर्षांपूर्वी फेसबुकमुळे राहुल माझ्यासोबत जोडले गेले. माझ्या लिखाणावर आणि व्याख्यानावर त्यांचे खूपच प्रेम यातूनच फेसबुकवर फॉलो करण्यापासून सुरू झालेला मैत्रीचा प्रवास आजच्या प्रत्यक्ष भेटीने पूर्ण झाला. राहुलजी घरी आल्यापासून सलग दोन तीन तास आमच्या गप्पा सुरु होत्या. पंख फुटलेल्या नव पाखराला जणू हवेत सोडावे आणि त्याने दिसेल तिकडे मनसोक्त विहार करावा असाच आमच्या गप्पांचा फड सुद्धा दाहीदिशा फिरून आला. आम्ही एकमेकांनी एकमेकांना विचारलेल्या प्रश्नांतुन मिळालेल्या उत्तरातून दोघेही समृद्ध झालो.


राहुल अतिशय प्रांजळ, प्रेमळ आणि दिलदार मनाचे गृहस्थ वाटले. ऑनलाइन भेटत असलेली माणसे ऑफलाइन भेटल्यावर ती आपल्या आयुष्यातील इनलाईन फ्रेंड होऊन जातात. आज राहुलजींचे तसेच झाले. अमेरिकेत माझे भरपूर मित्र आहेत पण त्यातले जिवलग म्हणावे असे मोजकेच आहेत त्या यादीत आज राहुलजींचा समावेश झाला आणि सोबत त्यांच्यामुळे महेश भोर यांचाही. माझे अमेरिकेत ऑनलाइन व्याख्यान झाल्यापासून ही जोडगोळी विशेष संपर्कात आली होती आज ती एकदम खास होऊन गेली.


राहुलची आणि माझी ही जरी पहिलीच भेट असली तरी जणू "पुराणे बिछडे हुए दोस्त बोहोत सालो बाद मिले" असाच फिल आमच्या भेटीत जाणवला. जाताना मी त्यांना माझ्या 'रायरी' कादंबरीसह इतर पुस्तकांची शिदोरी भेट दिली. सातासमुद्रापार असलेली ही माणसं शब्दाने जोडता आली याचे समाधान वाटतेय. प्रिय राहुल, आपण दिलेले प्रेम, आपुलकी आणि भेट सदैव स्मरणात राहील.


विशाल गरड

१९ जानेवारी २०२३, पांगरी





गोष्ट एका शस्त्रक्रियेची.

दिनांक १२ सप्टेंबरला मला आणि बार्शीचे प्रसिद्ध सर्जन डॉ.राहुल मांजरे यांना बार्शीत पुरस्कार होता त्यासाठी म्हणून मी पांगरीहून आधी डॉक्टरच्या...