Tuesday, May 30, 2023

बटरफ्लाय

आत्ताच माझे मित्र रामचंद्र इकारे सरांनी लिखित आणि दिग्दर्शित केलेली`बटरफ्लाय’ ही शॉर्ट फिल्म पाहिलीशॉर्टफिल्मच्या सुरुवातीलाच समर्पण पत्रिकेतील `संस्कार पेरणाऱ्या प्रत्येक क्षणाला समर्पित’ ही ओळ ह्रदयस्पर्शी वाटलीअवघ्या तेरा मिनिटांत गेल्यातेरा वर्षात घराघरात ज्वलंत झालेल्या विषयाला बोटावर मोजण्याइतक्या संवादाच्या आणि प्रभावी पार्श्वसंगीताच्या जोरावर सरांनी न्याय दिलायपांडुरंग फपाळ यांचा अभिनयतन्मय इकारेचे छायाचित्रण आणि संकलनके.जमीरचे पार्श्वसंगीत आणि हर्षदचे पोस्टर डिझाईन हे सगळंच भारी झालंयस्पेशली सांगायचं झालंच तर `सूर्योदय होताना फपाळ सरांच्या चेहऱ्यावरुन वरती सरकणारी सूर्यकिरणे आणि शेवटी चित्राला दोन बोटांनी दोन डोळे लावतानाचे सिन जाम आवडले


लहानपणी आपण आपल्या लेकरांना त्यांच्या ईच्छेनुसार

फुलपाखरासारखे स्वातंत्र्य देतो पण जसजशी ती मोठी होत जातात त्या फुलपाखराच्या भोवताली काळवंडलेलं वातावरण तयार होतं आणि त्या फुलपाखराचं रुपांतर कधी घुबडात होतं कळत नाहीआजच्या जगात दिवसा झोपणारी आणि रात्री जागणारी युवा पिढी निर्माण होत आहेव्यसनाधीनतेने असंख्य कुटुंब उध्वस्थ होत आहेतज्या घरात आई नाही त्याची किंमत त्या एकट्या बापाला कशी मोजावी लागते ? मुलासाठी बापाने पाहिलेले स्वप्न डोळ्यादेखत सिगरेटच्या धुरात जळताना त्याला काय वाटतं असेल ? स्वतःच्या लेकराबद्दल जेव्हा बाहेरचे लोक वाईट बोलू लागतात तेव्हा बापाची अवस्था काय होते ? ज्या वयात लेकरांवर हात उचलायला मेंदू परवानगी देत नाही त्याच वयात फक्त एका चित्रांतून एक कलाकार बाप त्याच्या मुलाला काय संदेश देतो ? हे बटरफ्लाय लघुपटात पाहायला मिळते


मुळातच इकारे सर हा प्रचंड कलाप्रेमी माणूसत्यांच्या कुंचल्यातून आजवर अनेक चित्र बाहेर आलीलेखणीतून अनेक कविता बाहेर आल्या आणि आता लघुपट येत असल्याचा आनंद वाटतो कारण सरांच्या नावातला राम ते त्यांच्या प्रत्येक कलाकृतीत असल्याची जाणीव करुन देत राहतातसरही शॉर्टफिल्म म्हणजे तुमच्या झुपकेदार मिशातील फक्त एक केस आहेअजुन लै मोठं काम उभारायचं आहे त्यासाठी तुमच्या संपूर्ण टिमला माझ्या सप्तरंगी शुभेच्छा.


विशाल गरड

३० मे २०२३पांगरी


(.टी - बटरफ्लाय ही शॉर्टफिल्म Ramchandra Ikare या You tube चॅनलवर पाहाण्यासाठी उपलब्ध आहे.)




Sunday, May 28, 2023

अंत्रे नावाचा आंत्रप्रन्योर

हा आहे माझा मित्र किरण अंत्रे, काल नाशिक येथील कार्यक्रमाच्या निमित्ताने तो भेटलाकिरण मला एक वर्ष ज्युनियर होताबोलण्यातदिसण्यात आणि वागण्यात सिंसिअर पोरगाकॉलेजला असतानाच त्याच्याकडे पाहुण वाटायचं की ये कुछ अलग करेगापठ्ठ्याने डिग्री झाली की नोकरी वगैरे ऑप्शन फाट्यावर हाणुन ध्रुव ऍग्री टेक्नोलॉजी ही कंपनी स्थापन केलीत्याच्या या निर्णयात त्याला वैभव पुंड ने साथ दिली आणि आमच्या कॉलेजच्या या जय विरूने उद्योग क्षेत्रात अद्वितीय कामगिरी करुन दाखवलीआज पर्यंतपोरांनी काहीतरी उद्योग सुरु केलाय एवढंच माहीत होतं पण आज किरणच्या घरी जाऊन जेव्हा त्याच्याकडून कंपनीचा संपूर्ण प्रवास जाणून घेतला तेव्हा किरण आणि वैभवचा अभिमान वाटला.


पासष्ठ हजार रुपयांची पहिली ऑर्डर मिळवून दहा बाय दहाच्या एका रुममध्ये सुरु झालेली ध्रुव ऍग्री टेक्नोलॉजी आज नाशिकमधील करोडो रुपयांचा व्यवसाय करणारी कंपनी ठरली आहेही कंपनी चिलेट बेस आहे ज्यात शेतीला लागणारे सुक्ष्म खते तयार केली जातातसंपूर्ण भारतासह परदेशातही ध्रुव ऍग्री टेक्नोलॉजी खते पुरवतेयइन्फोसिस कंपनी सुद्धा एका छोट्याशा खोलीतच सुरु झाली होती पण आज ती टॉपची कंपनी आहेकिरण आणि वैभवने गेल्या दहा बारा वर्षात दहा लाख किलोमोटरचा प्रवास केलायदिवस रात्र मेहनत केलीयेसुरुवातीच्या काळात दुचाकी गाडीवरून शेकडो किलोमीटरचा प्रवास करुन शेतकऱ्यांकडून ऑर्डर मिळवल्याआज फॉरच्युनरमधे फिरत असताना सुद्धा या पोरांच्या डोक्यात रिस्पेक्ट जिवंत आहे यातच त्यांच्या भविष्याचा आलेख दिसतो.


आंत्रप्रन्योर या शब्दाचा`आंत्र‘ हा शब्द पहिल्यापासूनच किरणच्या आडनावात होता ज्ञान आणि कष्टाच्या जोरावर मग त्याने प्रन्योरशिप मिळवलीविद्यार्थी ते यशस्वी उद्योजक हे अंतर खूप जलद पार करुन कृषीउद्योगात ध्रुव ताऱ्यासारखे चमकत राहणाऱ्या किरण अंत्रे आणि वैभव पुंड या दोस्तांचे कौतुकअभिनंदन आणि अभिमान वाटतोपोरांनो अजुन खूप मोठे व्हा हमारी सदिच्छा और आशिर्वाद बरकरार रहेंगे. 


विशाल गरड

२८ मे २०२३नाशिक




गुलीगत सुरजचा विजय असो !

निर्विवाद, निखळ आणि निरागस विजय !  ना मी बिग बॉस पाहिला, ना मी कुणाला मतदान केलय. त्याचे कारण असे की मी मुळात टीव्हीच फार कमी पाहतो. महत्वाच...