Tuesday, May 30, 2023

बटरफ्लाय

आत्ताच माझे मित्र रामचंद्र इकारे सरांनी लिखित आणि दिग्दर्शित केलेली`बटरफ्लाय’ ही शॉर्ट फिल्म पाहिलीशॉर्टफिल्मच्या सुरुवातीलाच समर्पण पत्रिकेतील `संस्कार पेरणाऱ्या प्रत्येक क्षणाला समर्पित’ ही ओळ ह्रदयस्पर्शी वाटलीअवघ्या तेरा मिनिटांत गेल्यातेरा वर्षात घराघरात ज्वलंत झालेल्या विषयाला बोटावर मोजण्याइतक्या संवादाच्या आणि प्रभावी पार्श्वसंगीताच्या जोरावर सरांनी न्याय दिलायपांडुरंग फपाळ यांचा अभिनयतन्मय इकारेचे छायाचित्रण आणि संकलनके.जमीरचे पार्श्वसंगीत आणि हर्षदचे पोस्टर डिझाईन हे सगळंच भारी झालंयस्पेशली सांगायचं झालंच तर `सूर्योदय होताना फपाळ सरांच्या चेहऱ्यावरुन वरती सरकणारी सूर्यकिरणे आणि शेवटी चित्राला दोन बोटांनी दोन डोळे लावतानाचे सिन जाम आवडले


लहानपणी आपण आपल्या लेकरांना त्यांच्या ईच्छेनुसार

फुलपाखरासारखे स्वातंत्र्य देतो पण जसजशी ती मोठी होत जातात त्या फुलपाखराच्या भोवताली काळवंडलेलं वातावरण तयार होतं आणि त्या फुलपाखराचं रुपांतर कधी घुबडात होतं कळत नाहीआजच्या जगात दिवसा झोपणारी आणि रात्री जागणारी युवा पिढी निर्माण होत आहेव्यसनाधीनतेने असंख्य कुटुंब उध्वस्थ होत आहेतज्या घरात आई नाही त्याची किंमत त्या एकट्या बापाला कशी मोजावी लागते ? मुलासाठी बापाने पाहिलेले स्वप्न डोळ्यादेखत सिगरेटच्या धुरात जळताना त्याला काय वाटतं असेल ? स्वतःच्या लेकराबद्दल जेव्हा बाहेरचे लोक वाईट बोलू लागतात तेव्हा बापाची अवस्था काय होते ? ज्या वयात लेकरांवर हात उचलायला मेंदू परवानगी देत नाही त्याच वयात फक्त एका चित्रांतून एक कलाकार बाप त्याच्या मुलाला काय संदेश देतो ? हे बटरफ्लाय लघुपटात पाहायला मिळते


मुळातच इकारे सर हा प्रचंड कलाप्रेमी माणूसत्यांच्या कुंचल्यातून आजवर अनेक चित्र बाहेर आलीलेखणीतून अनेक कविता बाहेर आल्या आणि आता लघुपट येत असल्याचा आनंद वाटतो कारण सरांच्या नावातला राम ते त्यांच्या प्रत्येक कलाकृतीत असल्याची जाणीव करुन देत राहतातसरही शॉर्टफिल्म म्हणजे तुमच्या झुपकेदार मिशातील फक्त एक केस आहेअजुन लै मोठं काम उभारायचं आहे त्यासाठी तुमच्या संपूर्ण टिमला माझ्या सप्तरंगी शुभेच्छा.


विशाल गरड

३० मे २०२३पांगरी


(.टी - बटरफ्लाय ही शॉर्टफिल्म Ramchandra Ikare या You tube चॅनलवर पाहाण्यासाठी उपलब्ध आहे.)




No comments:

Post a Comment

गुलीगत सुरजचा विजय असो !

निर्विवाद, निखळ आणि निरागस विजय !  ना मी बिग बॉस पाहिला, ना मी कुणाला मतदान केलय. त्याचे कारण असे की मी मुळात टीव्हीच फार कमी पाहतो. महत्वाच...