Thursday, May 4, 2023

थिएटर

चित्रपट निर्मिती हा एक व्यवसाय आहेव्यवसाय म्हणलं की स्पर्धा आलीच पण त्यातही थोडीशी समानता हवी.  भाऊराव कऱ्हाडे म्हणत आहेत तसे जर जाणीवपूर्वक कोणी टीडीएमचे शो कमी लावले असतील तर त्या मानसिकतेचा निषेधच पण तो निषेध करत असताना भावनांच्या पलिकडे जाऊन दोन्ही बाजूंचा विचार करुन लिहावे वाटले म्हणून हा लेखप्रपंचमी काय कोणी चित्रपट निर्मितीतला तज्ज्ञ-बिज्ञ अजिबात नाहीआपल्या बुद्धीच्या आवाक्यानुसारअनुभवानुसार माझ्यातल्या लेखकाला जे वाटले ते इथे टायपितोय इतकंचपटलं तर नक्की कमेंट करा


पिच्चरला जेवढी गर्दी जास्त तेवढा थिएटरला नफा सुद्धा जास्तच असतोआता यात कोण डिस्ट्रीबुटर कोणत्या थिएटर किंवा मल्टिप्लेक्सला किती टक्के नफा देतो यावरही शोचे स्क्रिनिंग अवलंबून असावेकधी कधी थेटरमधे जर एक दोन जण असतील तर शो रद्द होतोतसे करणे साहजिकच आहे पण प्रेक्षक असताना शो रद्द होत असेल तर ते थेटर चालक आणि निर्माते दोघांनाही तोट्याचेच असते मग हे असे का बरे होत असावे ?


यू ट्यूब वर अगदीच टुकार व्हिडीओला बिलियन लाईक असतात पण आपल्या आणि काही प्रेक्षकांच्या दृष्टीने खूप चांगला केंटेंट असलेल्या व्हिडिओला सुद्धा काही हजार किंवा फार तर फार लाखभर लाईक्स मिळतातसमय समय की बात अलग होती हैआमिरखान सारख्या बड्या अभिनेता आणि निर्मात्याला सुद्धा हजारो स्क्रिन मिळवून देखील फ्लॉपचा सामना करावा लागला तर ऋषभशेट्टीच्या कांताराने हळूहळू पडदा व्यापत इतिहास घडवलादिवसभरात आपला मूड जसा वेगवेगळा असतो तसाच आपल्या कलाकृती पाहण्याचा त्याला प्रतिसाद देण्याचा प्रेक्षकांचा मूडसुद्धा वेगवेगळा असू शकतो असे मला वाटतेम्हणूनच सैराट पाहिलेल्या सर्वांनीच झुंड आणि जीबीबी नाही पाहिला


थिएटर किंवा मल्टिप्लेक्स चालक चित्रपट व्यवसायातले रिटेलर आहेतत्यांना धंदा हवाच असतोत्यांच्याच जिवावर चित्रपट कोटीची उड्डाणे घेतातआपल्या देशात आज घडीला चित्रपट निर्माते जरी ढिगभर झाले असले तरी डिस्ट्रीबुटर मात्र मोजकेच आहेत त्यातही अनेक छूपे पदर असतात जे सर्वसामान्य प्रेक्षकांपर्यंत पोहोचत नाहीत हेही खरंयआपल्या महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यात किमान एक मल्टिप्लेक्स असायला हवे आणि प्रत्येक तालुक्यात एक दोन सिंगल स्क्रिन थेटर हवेत असे झाले तर भविष्यातील चित्र वेगळे असेलआजही कित्येक सिंगल स्क्रिन थिएटर मधे फक्त गुटख्याच्या वासामुळे फॅमिलीसोबत चित्रपट पाहणे निव्वळ अशक्य होतेसध्या ओटीटी प्लॅटफॉर्म आणि रिल्समुळे घरबसल्या ग्लोबल कंटेंट खूप स्वस्तात उपलब्ध झाल्याने घरीच मोठ्या स्क्रिनवर फिल्म बाघण्याचा टक्का वाढत चाललाययाचाही परिणाम थोडा का होईना चित्रपट व्यवसायावर झालाय हे मान्य करावे लागेल


सध्या गाणी आणि ट्रेलर म्हणजे भाताचे शित झाले आहेतकलाकृती चांगली शिजली का नाही हे त्यावरुनच ठरवले जातेयमग प्रेक्षकही गाण्याला किंवा ट्रेलरला किती दिवसात किती मिलियन व्हिव्ज आले यावरुन कोणती फिल्म बघायची हे ठरवतातहे होणे स्वाभाविकही आहेही झाली एक बाजू दुसऱ्या बाजूने पाहायचे झाले तर काही फिल्म्स पडद्यावर झळकत नाहीत पण ओटीटीवर येवून फक्त माऊथ पब्लिसिटीच्या जोरावर सुपरहित होतात याचे`जय भीम’ हे उत्तम उदाहरण आहे.


जेव्हा एकाच दिवशी चार पाच चित्रपट प्रदर्शित होतात तेव्हा थिएटर चालकांना सुद्धा प्रश्न पडत असेल की नेमकं कोणत्या पिच्चरचे किती शो लावायचेमग बिग बजेटबिग स्टार कास्टबिग पब्लिसिटीबिग कॉन्ट्राव्हर्सी असलेल्या चित्रपटांना आपसूक प्राधान्य दिले जातेआपण कितीही मराठी मराठी म्हणलोत तरी हॉलिवुडबॉलीवुड आणि साऊथवरचे प्रेम कमी करू शकत नाहीतयाआधी करोडो लोक केजीएफ  ची वेड्यासारखी वाट पाहून होते आणि आजही करोडो लोक पुष्पा  ची वाट पाहत आहेतउद्या समजा पुष्पा  सोबत जर कोणता मराठी वा हिंदी सिनेमा रिलीज होणार असेल तर साहजिकच सर्वात जास्त स्क्रिनवर पुष्पा लागलेला असू शकतो किंवा सुरुवातीला जरी कमी स्क्रिनवर लागला तरी कांतारा सारखा जास्त स्क्रिन व्यापू शकतो.  


सध्या बदलत्या काळानुसार प्री प्रॉडक्शनप्रॉडक्शन आणि पोस्ट प्रॉडक्शनसह प्रोमोशन आणि वितरणावरही पाण्यासारखा पैसा खर्च करावा लागतोय तेव्हाच एका रात्रीत गल्ला भरण्याची शाश्वती मिळू शकते त्यात पुन्हा नशिबाचा भाग आलाचलास्ट फ्रायडेला जर महाराष्ट्र शाहीर किंवा टीडीएम पैकी एकच मराठी सिनेमा रिलीज झाला असता तर आज चित्र वेगळे दिसले असतेसलग तीन दिवस सुट्टीचे मिळतात या आशेने निर्मात्यांनी त्या तारखा निवडल्या असतील कदाचित पण आठवड्यात दोन सिनेमे बघणारे किती लोक आहेत आपल्याकडे ? रिलीज डेटच्या आधीच्या आठवड्यात आलेली फिल्म आणि पुढील आठवड्यात येणारी फिल्म याचाही विचार होणे अत्यंत गरजेचे आहे


असे कितीतरी मराठी चित्रपट आहेत जे मेट्रो सिटीमधील ठराविक स्क्रिनवर प्रसिद्ध होतातते कधी येतात आणि जातात कळतही नाहीयात काही बडे प्रोड्युसर असतात जे आवड म्हणून दोन तीन खोके खर्चुन टाकतातजरी तोटा झाला तरी तो त्यांच्या फारसा जिव्हारी लागत नाही पण नव्याने पाऊल टाकणारे निर्मातेदिग्दर्शक अक्षरशः शेती विकूनघर दागिने घाण ठेवून चित्रपट करतात मग अशांना जर तोटा झाला तर सगळं कोलमडून जातं


बाकी राहिला विषय मराठी चित्रपट सृष्टीचातर दर्जेदार चित्रपट बनवण्यासोबतच फक्त अनुदान मिळवण्यापुरते चित्रपट बनवणारी मंडळी सुद्धा आपल्याकडे आहेतजेवढी उदाहरणे फ्लॉपची असतील तेवढीच हिट आणि सुपर डुपर हिटची पण आहेतवर्तमान आणि भविष्यातही चित्रपटांचा चढ उतार सुरूच राहिल पण एक दिवस नक्की येयील मराठी सिनेमाचा जेव्हा सगळ्या जगाला दखल घ्यावी लागेलअहो जास्त नाही फक्त दहा पंधरा वर्षापूर्वी ज्या साउथच्या फायटींग सिनची आपण टिंगल करायचो आज त्याच साउथने ऑस्करवर आपले नाव कोरलंयसमय बडा पेहलवान होता हैमराठी चित्रपटसृष्टी जिंदाबाद थी और आगे भी जिंदाबाद रहेगी बस थोडा दौर गुजर जाने दो. हिम्मत रखो दोस्तो. 


विशाल गरड

 मे २०२३पांगरी





1 comment:

  1. अभ्यासपूर्ण लेखन विशाल..अभिनंदन

    ReplyDelete

गुलीगत सुरजचा विजय असो !

निर्विवाद, निखळ आणि निरागस विजय !  ना मी बिग बॉस पाहिला, ना मी कुणाला मतदान केलय. त्याचे कारण असे की मी मुळात टीव्हीच फार कमी पाहतो. महत्वाच...