बुचाडला दिलेल्या उदंड प्रतिसादानंतर आमचा`तोड’ हा नवीन लघुचित्रपट लवकरच पूर्णत्वास जात आहे. ऊसतोड कामगार असलेल्या हाम्या आणि निमीची ही एक ह्रदयस्पर्शी गोष्ट आहे ज्यातून ऊसतोड मजुरांचे ज्वलंत प्रश्न मांडण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलाय. यानिमित्ताने माझ्या व्यक्तिमत्त्वात दडलेल्या लेखकाला, दिग्दर्शकाला, अभिनेत्याला, कॅलिग्राफरला आणि गायकाला न्याय देता आल्याचे समाधान आहे.
जेव्हा दिग्दर्शकाच्या डोक्यातला चित्रपट तो त्याच्या टिमच्या डोक्यात उतरवतो तेव्हा तो अख्ख्या टिमचा बनून जातो. तोडच्या बाबतीत तसंच झालं. माझ्या डोक्यातली गोष्ट जयसिंह पवार, कवी बालाजी मगर, अभिनेत्री वैष्णवी जानराव, सचिन नलावडे, शुभम मिसाळ आणि हनुमंत हिप्परकर या टिमच्या डोक्यात घुसवण्यात मी यशस्वी झाल्याने या सगळ्यांच्या साथीने विचारांना आलेल्या मोडपासून तोड निर्माण करण्यास बळ लाभले.
नोव्हेंबर २०२२ अखेरीस मी तोडचा स्क्रिनप्ले लिहिला होता आणि लगेच डिसेंबर अखेरीस जवळ जवळ सत्तर टक्के चित्रिकरण पुर्ण केलेत्यानंतर काही सिन्सचे चित्रिकरण जानेवारी आणि एप्रिल २०२३ मधे करावे लागले. गेल्या महिनाभरापासून तोडचे संकलन सुरु आहे त्यासाठी तोडचे सिनेमॅटोग्राफर आणि एडिटर जयसिंह पवार जीवतोड मेहनत घेत आहेत. एका एका फ्रेमवर मजबूत काम सुरु आहे.
आजवर माझ्या सगळ्या फिल्म्सची आणि पुस्तकांची टायटल कॅलिग्राफी मी स्वतःच केली असल्याने तोडची कॅलिग्राफी सुद्धा तितकीच अर्थपूर्ण होण्यासाठी मेहनत घेतली होती. जितकी अर्थपूर्ण कॅलिग्राफी झाली आहे तितकाच अर्थपूर्ण कंटेंट चित्रपटाच्या माध्यमातुन देण्याचा प्रयत्न केलाय. आजच्या या पहिल्या पोस्टने तोडची वात पेटवली आहे अब धमका तो जरूर होगा. अबसे तोड के अपडेट्स जारी रहेंगे. बस्स आपका प्यार बरकरार रखना.
विशाल गरड
लेखक तथा दिग्दर्शक`तोड’
No comments:
Post a Comment