Tuesday, May 2, 2023

म्होरक्या

आज ऍमेझॉन प्राईमवर अमर देवकर दिग्दर्शित राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त म्होरक्या चित्रपट पाहिलाखूप संघर्षातून अमर सरांनी म्होरक्या म्होरं नेवून दाखवलायहा चित्रपट तयार होवून प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याच्या प्रक्रियेचाही एक नवीन पिच्चर होवू शकतो किंवा पुस्तक होवू शकतं इतके चढ उतार त्यांनी पाहिले आहेतअसोम्होरक्या प्राईमवर रिलीज झाल्यापासून तो पाहायला मला जरा नव्हे तर बराच उशीर झालाय हे मान्य पण कलाकृती कधीच जुनी होत नसते ती जोपर्यंत आपल्याला पाहायला मिळत नाही तोपर्यंत ती नविनच असतेसो तुम्हीही अजुन नसेल पाहिला तर नक्की बघा


रमन देवकरने आशाची आणि ऋतुराज कऱ्हाडेने बाळ्याची भूमिका प्रभावी साकारली आहेशाळकरी मुलांकडून कसलेला अभिनय करुन घेण्यात अमर सर यशस्वी ठरलेतया चित्रपटात प्रमुख कलाकारांसह कॅडेट नावाचा कुत्राकाजोल नावाची म्हैस आणि कटरीना नावाची मेंढी स्टार्ट टू एंड चित्रपट पाठीवर घेवून फिरताना दिसतेजेव्हा आशा मेंढरं राखताना उभा राहतो तेव्हा त्याच्या सावलीत भारताचा नकाशा दिसतोमग जशी आपली सावली आपला पिच्छा सोडत नसते तशीच देशभक्तीदेशप्रेमपरेड या गोष्टी कथानकाला अजिबात सोडत नाहीतशुद्ध आर्ट फिल्म असली तरी यात अगदीच हलकी फुलकी दुधावर साय जमावी एवढी गोड लव्हस्टोरी आहेपिच्चर पाहताना मेंदू विचार करण्यात गुंग असतानाच निकिता स्क्रिनवर आली की मग ह्रदयाचा लहानपणीचा कप्पा उघडतो आणि बचपण का प्यार जागवतो


अस्सल ग्रामीण बार्शीच्या शिव्यांनी संवादाला सोन्याचा मुलामा दिलायलोकेशन्स अचूक निवडल्यातब्ल्यू हावर मधे शूट केलेले सगळेच सीन बाप चित्रित केलेतअमर देवकरांनी साकारलेला डबलरोल नवख्या माणसाच्या सहसा लक्ष्यात येत नाहीपण त्यांनी अर्धमुक्या युवकाचा नाकातून संवाद अप्रतिम केलाययात मारुतीच्या डोळ्याला पट्टी बांधलेला एक सिन आहेसद्य परिस्थिती पाहता काही माणसांनी देवांच्या सुद्धा डोळ्यावर पट्टी बांधल्याचे लेखकाला सांगायचे असावे


बाभळीच्या झाडाचा डिंक काढतानादोऱ्याने पपई चिरतानामेंढीची डिलिव्हरी होतानादेवांच्या चित्रांची पाकीटे खेळतानाकोयत्याने झाडलेली मोहोळेगोमतर आबाच्या पायातला काटा काढतानातांब्यात कोळसा घालून इस्तरी करतानाआशा संडासला बसल्यावर त्याच्या टंबराळ्यात पडलेला मुंगळा काटकीवरुण बाहेर येतानालिंबाऱ्याच्या खोडाला पालवी फुटताना हे सगळे सिन काळजावर छापण्यासारखे आहेतम्होरक्याला राष्ट्रीय पुरस्कार का मिळाला असेल याचे उत्तर वरील फ्रेममधून मिळते


`दुश्मन आतच’ आहे हा वेडा आण्ण्याचा डायलॉग माणसाच्या आतच देशाचा खरा शत्रू दडला असल्याचे संकेत देतो म्हणूनच आधी आपल्यातल्या गद्दाराशी युद्ध व्हायला हवेबाहेरच्यांपेक्षा आपलीच माणसे जातवर्णधर्मकुळव्यवसाय पाहून आपल्यावर अन्याय करीत असतातआपली संधी क्षमता असतानाही चोरून घेत असतातम्हणूनच आशा सोबतच्या एका संवादात गोमतर आबा म्हणतात`गणतंत्रचं गोमतर करुन टाकलंय माणसांनी’ पुढे पायातला काटा काढतानाच्या संवादामधूनही`आयुष्यात कितीतरी काटे पायात मोडतातकाही निघतात काहींचे कुरूप होवून बसते पण कुरूपातला काटा टोकरून टोकरून काढायला हवा’ हा संदेश मिळतो


गणतंत्र आबा सारखी जुनी खोडं आपले जीवंत राष्ट्रध्वज आहेतअडाणी वेडी माणसं सुद्धा या देशाचे नागरिक असतातनिस्वार्थ देशभक्त असतातइथल्या समाज व्यवस्थेने त्यांना दगडं मारुन वेडं केलंयसंपूर्ण चित्रपट पाहिल्यानंतर शेवटी मुक्या आईच्या पोटचंपोर जेव्हा पुर्ण क्षमतेने परेडची कमांड देतो तेव्हा आपसूकच अंगावर काटा उभारतो आणि डोळ्यात पाणी तरळते.


`जी म्होर नेतो त्योच म्होरक्या’,

`येड्याला काय भ्यायचंयआरं याड पांघरलेल्याला भ्याव माणसांनी

`दुश्मन आतच आहे

म्होरक्या मधली ही वाक्य चित्रपटाचे सार सांगायला पुरेशी आहेत त्यावर अधिक काय लिहावेम्होरक्यातील पडद्यावरील व पडद्यामागील माझ्या सर्व दोस्तांचे खूप सारं कौतुक आणि अमर सरांना त्यांच्या पुढील चित्रपटांसाठी आम्रसा इतक्या गोड शुभेच्छा


विशाल गरड

 मे २०२३पांगरी






No comments:

Post a Comment

गुलीगत सुरजचा विजय असो !

निर्विवाद, निखळ आणि निरागस विजय !  ना मी बिग बॉस पाहिला, ना मी कुणाला मतदान केलय. त्याचे कारण असे की मी मुळात टीव्हीच फार कमी पाहतो. महत्वाच...