हा आहे माझा मित्र किरण अंत्रे, काल नाशिक येथील कार्यक्रमाच्या निमित्ताने तो भेटला. किरण मला एक वर्ष ज्युनियर होता. बोलण्यात, दिसण्यात आणि वागण्यात सिंसिअर पोरगा. कॉलेजला असतानाच त्याच्याकडे पाहुण वाटायचं की ये कुछ अलग करेगा. पठ्ठ्याने डिग्री झाली की नोकरी वगैरे ऑप्शन फाट्यावर हाणुन ध्रुव ऍग्री टेक्नोलॉजी ही कंपनी स्थापन केली. त्याच्या या निर्णयात त्याला वैभव पुंड ने साथ दिली आणि आमच्या कॉलेजच्या या जय विरूने उद्योग क्षेत्रात अद्वितीय कामगिरी करुन दाखवली. आज पर्यंतपोरांनी काहीतरी उद्योग सुरु केलाय एवढंच माहीत होतं पण आज किरणच्या घरी जाऊन जेव्हा त्याच्याकडून कंपनीचा संपूर्ण प्रवास जाणून घेतला तेव्हा किरण आणि वैभवचा अभिमान वाटला.
पासष्ठ हजार रुपयांची पहिली ऑर्डर मिळवून दहा बाय दहाच्या एका रुममध्ये सुरु झालेली ध्रुव ऍग्री टेक्नोलॉजी आज नाशिकमधील करोडो रुपयांचा व्यवसाय करणारी कंपनी ठरली आहे. ही कंपनी चिलेट बेस आहे ज्यात शेतीला लागणारे सुक्ष्म खते तयार केली जातात. संपूर्ण भारतासह परदेशातही ध्रुव ऍग्री टेक्नोलॉजी खते पुरवतेय. इन्फोसिस कंपनी सुद्धा एका छोट्याशा खोलीतच सुरु झाली होती पण आज ती टॉपची कंपनी आहे. किरण आणि वैभवने गेल्या दहा बारा वर्षात दहा लाख किलोमोटरचा प्रवास केलाय. दिवस रात्र मेहनत केलीये. सुरुवातीच्या काळात दुचाकी गाडीवरून शेकडो किलोमीटरचा प्रवास करुन शेतकऱ्यांकडून ऑर्डर मिळवल्या. आज फॉरच्युनरमधे फिरत असताना सुद्धा या पोरांच्या डोक्यात रिस्पेक्ट जिवंत आहे यातच त्यांच्या भविष्याचा आलेख दिसतो.
आंत्रप्रन्योर या शब्दाचा`आंत्र‘ हा शब्द पहिल्यापासूनच किरणच्या आडनावात होता ज्ञान आणि कष्टाच्या जोरावर मग त्याने प्रन्योरशिप मिळवली. विद्यार्थी ते यशस्वी उद्योजक हे अंतर खूप जलद पार करुन कृषीउद्योगात ध्रुव ताऱ्यासारखे चमकत राहणाऱ्या किरण अंत्रे आणि वैभव पुंड या दोस्तांचे कौतुक, अभिनंदन आणि अभिमान वाटतो. पोरांनो अजुन खूप मोठे व्हा हमारी सदिच्छा और आशिर्वाद बरकरार रहेंगे.
विशाल गरड
२८ मे २०२३, नाशिक
No comments:
Post a Comment