Tuesday, October 31, 2023

बलिदान नको, जीवदान द्या !

 फक्त समाजाच्या कल्याणकारी भविष्यासाठी स्वतःच्या घरादारावरकुटुंबीयांवर तुळशीपत्र ठेवणाऱ्या अशा विश्वासूनिडरलढवैयासंघर्षवादीसंयमीदृढनिश्चयीमराठा अभिमानी योद्ध्याला कुणी मरायला सोडून देतं का ? ज्याने लढा उभारलासर्वांची एकी केलीलढायला बळ दिले तोच धारातीर्थी पडलेला आपल्याला पाहवेल का ? माणसांच्या वेदना वाचायला आणि त्या मांडायला येणारामराठ्यांच्या विद्यापीठातल्या लोकज्ञानाचा हा ज्ञानसुर्य डोळ्यादेखत विझताना पाहायचाय का ? 


नाही नाही नाहीकदापी नाही !


हा लढा जरी आरक्षण मिळवण्याचा असला तरी यात जरांगे पाटलांना गमवायचे नाही हीच भावना माझ्यासह तमाम मराठ्यांची आहेजर त्यांच्या हट्टापायी त्यांचाच जीव धोक्यात जाणार असेल तर एवढ्या बाबतीत पाटलांचे ऐकायचे नाहीकाहीही करुन ताबडतोब त्यांच्यावर उपचार सुरु होणे खूप गरजेचे आहेवेळप्रसंगी त्यांच्यावर बळजबरीने सलाईन लावायची वेळ आली तरी अंतरवालीतील ग्रामस्थत्यांचे निकटवर्तीय आणि त्यांच्या मुलीने ही जबाबदारी घ्यावी पण जरांगेंना जित्ता ठेवा कारण त्यांना भल्या भल्यांचा कित्ता पुरा करायचाय


पाटील,

ज्यावेळी माणूस लोकांचा होतो तेव्हा त्याच्या जीवावर सुद्धा लोकांचा अधिकार प्राप्त होतोयाच अधिकाराने या देशातील कोटी कोटी मराठ्यांच्या वतीने मी विशाल गरड तुम्हाला जाहीर विनंती करतो की तुम्ही तत्काळ उपचारास परवानगी द्यावी अन्यथा तुमच्या पश्च्यात उगवलेला सूर्य बघण्याची आमची हिंमत नाहीदया करा पाटीलजर तेच तुमच्या मरणाची वाट पाहत असतील तर त्यांना जिंकू देवू नकाअजून लढाया उभा करु आणि जिंकूही फक्त तुमचं बलिदान देवू नका.”


मराठा विशाल गरड

३१ ऑक्टोबर २०२३पांगरी




जरांगे पाटलांची भेट

समाजासाठी इतक्या उच्च कोटीचे आत्मसमर्पणबाप रे ! अनेक उपोषणे पाहिली पण इतक्या टोकाचे उपोषण आणि दृढनिश्चय मी पहिल्यांदाच पाहतोयआज जरांगे पाटलांचा सात दिवस विना अन्न पाण्याचा चेहरा पाहून पोटात कालवलेत्यांच्याशी बोलताना जीभ जड जात होतीप्रकृती वेगाने ढासळत आहे तरी ते कुणाचेच ऐकायला तयार नाहीतआरक्षण हाच माझा उपचार आहे असे म्हणतायेत

काही दिवसांपूर्वीच मी एका व्हिडीओच्या माध्यमातून पाटलांना विनंती केली होतीआज माऊली पवारशिवाजी पाटीलऍड.श्रीरंग लाळेडॉ.प्रमोद पाटील यांसमवेत अंतरवाली सराटीत जाऊन जरांगे पाटलांना प्रत्यक्ष भेटून विनंती केली की “पाटीलसद्यस्थिती पाहता तमाम महाराष्ट्रातील जनतेचे तुमच्या जिवाला सर्वोच्च प्राधान्य आहेतुम्ही जिवंत राहिलात तरच ही लढाई जिंकता येईलतुमच्यानंतर जर आत्मआहुत्या झाल्या तर हे परवडणारं नाहीगड आला पण सिंह गेला अशी इतिहासातली पुनरावृत्ती पुन्हा होवू द्यायची नाही म्हणून आमची हात जोडून विनंती आहे तुम्ही पाणी प्या.”


यावेळी उपस्थित आमच्या सर्वांच्या विनंतीस मान देवून पाटलांनी एक ग्लास पाणी पिले आणि त्यांना पाणी पिताना पाहून आमच्या हृदयाची तहान भागलीयानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी स्पष्ठपणे सांगितले की “मराठ्यांनो शांततेत आंदोलने कराउद्या संध्याकाळपर्यंत जाळपोळतोडफोडीची एकही घटना मला नको आहे” सात दिवस अन्नाचा कण आणि पाण्याचा थेंब पोटात नसणारा माणूस आपल्याला काहीतरी सांगतोयमहाराष्ट्रातील तमाम मराठा बांधवांनी त्यांच्या विनंतीचे पालन करावे एवढीच इच्छा.


शेवटी अंतरवालीतून निघताना तेथील स्थानिक गावकऱ्यांशी आणि पाटलांच्या निकटवर्तीयांशी चर्चा करुन तुम्ही काहीही करुन पाटलांना उपचार घ्यायला  इथून पुढे पाणी पिऊन उपोषण सुरु ठेवण्यास भाग पाडा अशी विनंती केलीकारण सर सलामत तो पगडी पचासआज एका वादळाला भेटून आलोयजवळून अनुभवून आलोयखरं सांगतो लोकजनहो असे नेतृत्व शंभर वर्षात एकदाच जन्माला येतेआरक्षण तर मिळेल तेव्हा मिळेल पण तुर्तास मराठ्यांना एवढं दृढनिश्चयी नेतृत्व मिळाल्याचे समाधान आहेकाहीही होवो जरांगे जित्ते राहिलेच पाहिजेएक मराठालाख मराठा 


विशाल गरड

३० ऑक्टोबर २०२३अंतरवाली सराटी.




Tuesday, October 24, 2023

बुद्धिवंत तात्या बोधे

आज दसऱ्याच्या शुभदिनी विचारांचे सोने स्विकारण्यासाठी आमच्या पांगरीचे जेष्ठ पत्रकार तात्या बोधेंची भेट घेतलीआमच्या गावातल्या या ऐंशी वर्षाच्या समृद्ध विद्यापीठात मला नेहमीच नवनवीन शिकायला मिळतेआज तात्यांच्या घरी गेल्यागेल्याच `विशाल लोकमतमधला तू राजाभाऊंवरचा लिहिलेला लेख मला फार आवडला’ अशी प्रतिक्रिया दिलीतात्या आजही वृत्तपत्रातील प्रासंगिक लेख आवर्जून वाचतात  त्याबद्दल कधी भेटून तर कधी फोनवरून प्रतिक्रिया देतातइतरवेळीही लिहिलेल्या लिखाणावर सुद्धा ते भरभरून बोलतातत्यांना पत्रलेखनाचा छंद असल्याने अनेक पत्र त्यांनी संग्रही ठेवली आहेत.


त्यांच्या नातीने पाठवलेले पत्र आज त्यांनी माझ्याकडून वाचून घेतलेते ऐकताना त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद टिपण्यासारखा होताजगकितीही टेक्नोलॉजीने पुढे जाऊद्या जोपर्यंत तात्यांसारख्या जेष्ठ मित्रांचा हात माझ्या खांद्यावर आहे तोपर्यंत माझे लिखाण नवनवीन आयाम गाठत राहीलमी पुस्तकं ढिगभर वाचली पण त्यासोबत हजारो पुस्तकांचा अर्क ज्यांच्या व्यक्तिमत्त्वात मुरलेला असतो अशी तात्यांसारखी माणसं वाचली म्हणूनच माझ्या विचारांना समृद्धी लाभलीतात्या दीर्घायुषी व्हातुम्हाला जेव्हा केव्हा भेटतो तेव्हा मला बापूंची आठवण होतेतुमच्या मार्गदर्शनाचा मी सदैव भुकेला


विशाल गरड

२४ ऑक्टोबर २०२३पांगरी






भेटला विठ्ठल

कधी कधी वाटते की इन्स्टाग्रामवर माझे एक लाख नाही तर एक करोड फॉलोवर्स आहेत. कारण हल्ली सहज जरी कुठे बाहेर पडलो तरी एखादा तरी फॉलोअर्स भेटतोच....