Sunday, August 7, 2016

| जिवदान ©

| जिवदान ©

रोज काॅलेजला जायची माझी पायवाट पावसाळ्यामुळे आता पाण्यात बुडाली आहे. अनवाणी पायाने चालताना चटका देणारी दगडं आता शेवाळली आहेत. निवळसंग पाणी दगडांना घोळीत पुढे जात आहे. याच वाटेवर उक्कडगावहुन माझ्या काॅलेजकडे जाताना वड्यात एक झाड लागते. उन्हाळ्याने शाप दिलेल्या या झाडाला पावसाळ्याने मात्र जिवदान दिलंय. या झाडाच्या खोडावर जर उन्हाळ्यात एखादी ठिणगी पडली असती तर कदाचीत हे जळुन राख झालं असतं एवढी वाळवी त्याला लागलेली, वाटेवरून जाणाऱ्या कित्येक वाटसरूंनी सरपणासाठी त्याचे खवले काढुन नेलेले. फांद्या नावाचा तर अवयवच शिल्लक नव्हता राहीलेला. अगदी एखादी जोराची लाथ दिली तरी कोलमडुन पडलं अशी त्याची अवस्था पण त्याच वाळलेल्या खोडात एक जिवंत रसवाहिनी अजुनही पावसाची वाट पहात बसली होती. पहिल्याच पावसात वाळवी धुवुन गेली आणि मग त्या एका जिवंत रसवाहिनीने त्या वाळलेल्या खोडातील ईतर रसवाहिन्या जाग्या केल्या म्हनुनच आज त्या वाळलेल्या खोडावर सुद्धा हिरवागार मुकुट फुललाय. प्रेरणादायी गोष्टी शिकण्यासाठी मला जास्त पुस्तके वगैरे वाचायची गरजच नाही पडत कारण माझी ही गरज माझा निसर्गाकडे पाहण्याचा दृष्टीकोण पुर्ण करतो.
प्रा.विशाल गरड लेखक झाला तो याच विद्यापीठातुन. निसर्गाने माझ्या नजरेला दाखवलेले प्राक्टीकल मी व्यवस्थित पुर्ण केलंय, त्यावर लिखाण करूण थेरी पण तगडी केलीय. तुम्ही आजवर दिलेल्या प्रतिक्रियेतुन मार्क पण चांगली पडलीयेत. आज या झाडानं मला एक गोष्ट आपल्यापर्यंत पोहचवायला सांगीतलीए की मरणाच्या दारात सुद्धा जगण्याची एखादी उमेद शिल्लक असतेच, काय ठाऊक ती कधी सुरू होईल. सध्यातरी मला शेतकरी आणि हे झाडं दोघंही सारखीच भासतात. शेवटी मला एवढंच सांगावसं वाटतं की एखाद्या वाईट परिस्थितीमुळं तात्काळ मरण पत्करण्यापेक्षा त्या मरणाची वाट पाहत थाबणं केव्हाही चांगलं; कुणास ठाऊक कधी मरणाच्या उंबरठ्यावर आपल्यातलीही एखादी रसवाहिनी जागृत होऊन जिवदान देईन.

✍| प्रा.विशाल गरड - पांगरीकर
( लेखक डाॅ.चंद्रभानु सोनवणे कनिष्ठ महाविद्यालय, उक्कडगांव येथे प्राध्यापक म्हणुन कार्यरत )

No comments:

Post a Comment

गुलीगत सुरजचा विजय असो !

निर्विवाद, निखळ आणि निरागस विजय !  ना मी बिग बॉस पाहिला, ना मी कुणाला मतदान केलय. त्याचे कारण असे की मी मुळात टीव्हीच फार कमी पाहतो. महत्वाच...